मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – ‘भाबीजी घर पर है’ हि हिंदी मालिका प्रेक्षकांना खूप आवडत आहे. यामध्ये अनिता भाभीची भूमिका साकारणारी मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे हिने महिलांना एक कानमंत्र दिला आहे. आताच्या घडीला महिला सुद्धा घराबाहेर पडल्या आहेत. चार पैसे कमावण्याची क्षमता या महिलांमध्ये आहे. प्रत्येक स्त्री आज मेहनत करत आलेल्या परिस्थितीचा खंबीरपणे सामना करत आहे.
जग जेव्हा कोरोनाच्या महामारीचा सामना करत होते तेव्हा जगभरातील सर्व महिलांनी स्थिती स्वतःच्या हातामध्ये घेतली. महिलांनी व्यावसायिक जीवनापासून घरामध्ये संतुलन राखण्यापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळवले. असे कोणतेच काम नाही, जे त्यांनी केले नाही आणि ते काम अधिक उत्तमरित्या केले. नेहा पेंडसे म्हणाल्या समाजात लैंगिक असमानतेचा परिणाम कमी झाला आहे. विशेषत: मेट्रो शहरांमधील महिला एकमेकींना पाठिंबा देण्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. जगाला समजले आहे की, महिला कमकुवत नसून पुरूषांइतक्याच समान आहेत असे देखील नेहा पेंडसे म्हणाल्या.
View this post on Instagram
‘भाबीजी घर पर है’ या मालिकेतील आपल्या पात्राविषयी बोलताना त्या म्हणाल्या, अनिता भाभी ही समकालीन व आजच्या काळातील महिला आहे. ती अनेक महिलांसाठी प्रेरणास्रोत देखील आहे. कारण ती स्वतःचा विचार करते आणि स्वतःच्या जीवनाकडे लक्ष देते. अनिता भाभी ही धाडसी आहे आणि विश्वास असलेल्या गोष्टीच्या मागे खंबीरपणे उभी राहते. ती सहजासहजी निराश होत नाही. प्रेक्षकांकडून तिच्या या गुणांची नेहमीच प्रशंसा करण्यात येते. महिला प्रेक्षक तिच्याकडे आदर्श म्हणून पाहतात. ती एक हुशार महिला आहे आणि मला तिचे हे गुण खूप आवडतात. हेच साम्य माझ्यात आणि अनितामाध्ये आहे असे नेहा पेंडसे यांनी सांगितले. प्रेक्षक अशा प्रबळ महिलांकडे त्वरित आकर्षित होतात. तसेच त्यांची प्रशंसा व कौतुक देखील करतात.
View this post on Instagram
View this post on Instagram
नेहा पेंडसे पुढे म्हणाली, आवाज उठवणे आणि स्वतःचे विचार व्यक्त करणे खुप गरजेचे आहे. हा स्वार्थीपणा नाही तर, आपला विश्वास असणाऱ्या गोष्टीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे आणि ते कार्य पूर्ण केले पाहिजे. नेहमी आपले डोळे व कान उघडे ठेवा, जागरूक राहा. तुम्ही कोण आहे आणि जीवनात तुम्हला काय पाहिजे हे व्यक्त करायला शिका. स्वावलंबी बनायला शिका आणि नेहमी स्वतःचे ऐका !