मुंबई :बहुजननामा ऑनलाईन- देशात सध्या ऑनलाइन फसवणूकीचे प्रमाण खुप वाढले आहे. सायबर क्राईमच्या घटनांमध्ये होत असलेली ही मोठी वाढ सर्वसामान्यांसह प्रशासनासाठी देखील चिंतेचा विषय झाली आहे. अशा फसवणुकीच्या घटना वाढल्याने इन्कम टॅक्स विभागानेही पुन्हा अलर्ट जारी केला आहे. मेसेज, इमेल किंवा लिंक यावर विचार करूनच क्लिक करा, अन्यथा तुमचे खाते रिकामे होऊ शकते, असा इशारा करदात्यांना दिला आहे. मागील अनेक महिन्यांपासून इन्कम टॅक्स विभागाच्या नावाने लोकांना खोटे ई-मेल, एसएमएस, तसेच वेबसाईटच्या लिंक मोबाईलवर पाठवून फसवणूक करण्याचा प्रयत्न होत आहे. यासाठी सावधगिरीचा इशारा इन्कम टॅक्स विभागाने दिला आहे.
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठीच्या मुदतीत अनेक लोकांना खोटे ईमेल, खोटे मेसेज आणि लिंक पाठवल्या जातात. याद्वारे लोकांना गंडा घालण्याचे प्रकार सुरू आहेत. यासाठी इन्कम टॅक्स विभागाने हा अलर्ट जारी केला आहे. इन्कम टॅक्स विभागाने म्हटले आहे की, नोटीशीच्या निमित्ताने एसएमएस, ई मेल, किंवा वेबसाईटला भेट देण्यास सांगितले जाऊ शकते. त्या वेबसाईटला भेट दिल्यानंतर वैयक्तिक माहिती मागितली जाते. ही माहिती लोकांच्या खात्यापर्यंत पोहोचण्यासाठी सायबर गुन्हेगारांना उपयोगी पडते. हे टाळण्यासाठी सावधगिरी हा एकमेव पर्याय आहे. मेसेजद्वारे आलेल्या लिंकवर क्लिक केल्यास अडचणीत येऊ शकता. या लिंकवर क्लिक केल्यावर युजरनेम, पासवर्ड आणि कार्डाची माहिती मागितली जाते, ती दिल्यास तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते.
इन्कम टॅक्स विभागाने जारी केलेले ई-मेल
@incometax.gov.in @incometaxindiaefiling.gov.in,@tdscpc.gov.in, @cpc.gov.in, @nsdl.co.in, @utiitsl.com, @insight.gov.in
SMS सोर्स कोड –
ITDEPT, ITDEFL, TDSCPC, ITDCPC, CMCPCI, INSIGT, SBICMP, NSDLTN, NSDLDP, UTIPAN
इनकम टॅक्स विभागाच्या अधिकृत वेबसाइट
http://www.incometaxindia.gov.in
http://www.incometaxindiaefiling.gov.in
http://www.tdscpc.gov.in
http://www.insight.gov.in
http://www.nsdl.gov.in
http://www.utiistl.com
खोटे मेसेज अथवा मेल आल्यास हे करा
करदात्यांना खोटा SMS अथवा ई मेल आल्यास इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवर जाऊन तक्रार करा. यासाठी http://www.webmanager@incometax.gov.in किंवा http://www.incident@cert-in.org.in या वेबसाईटवर जा.
Visit : bahujannama.com