बहुजननामा ऑनलाइन टीम – एटीएम मशीनमधून एटीएम कार्डद्वारे पैसे काढणे (ATM)सध्या समान्य बाब आहे. जवळपास प्रत्येक व्यक्ती एटीएमचा वापर करतो. मात्र एटीएम मशीनमधून पैसे काढताना काही गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर संपूर्ण अकाऊंट रिकामे होऊ शकते.
यासाठी एटीएममधून पैसे काढताना तुम्ही काही विशेष गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आज आम्ही तुम्हाला आपल्या या स्टोरीमध्ये हेच सांगणार आहोत की, एटीएममधून पैसे काढताना कोणत्या गोष्टींबाबत सावधगिरी बाळगावी…
1- नेहमी गर्दीच्या भागातील एटीएमचा वापर करा, निर्जन परिसरात फ्रॉड जास्त होण्याची शक्यता असते.
2- आपल्या ट्रांजक्शनची रिसिट कधीही फेकू नका. ही माहिती तुमच्या विरोधात सुद्धा वापरली जाऊ शकते. वापरानंतर रिसिट ताबडतोब नष्ट करा.
3- जेव्हा तुम्ही पैसे काढाल तेव्हा कॅन्सल बटन शेवटी जरूर दाबा.
4- अशा एटीएम मशीनचा वापर करा जिथे सीसीटीव्ही असेल.
5- तुम्ही एटीएममध्ये पिन टाकण्यापूर्वी किपॅड आणि कार्ड स्लॉटकडे लक्ष द्या. कधीकधी हा डिव्हाइस तुमची कॅश रोखू शकतो. असे झाल्यास ताबडतोब बँकेकडे तक्रार नोंदवा.
6- एटीएम लाइनमध्ये तुमच्या मागे उभा असलेला व्यक्ती तुमचा पासवर्ड सहज पाहू शकतो. यासाठी डेबिट कार्डचा पिन टाकताना हाताने एटीएमचा किपॅड लपवा.
7- कुणासोबतही आपली पर्सनल डिटेल्स शेयर करू नका.