नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात हेल्मेट (Helmet) सक्ती करण्यात आल्याने अनेकजण दुय्यम दर्जाचे हेल्मेट वापरत आहेत. तर काही जण बेकायदेशीर (Illegal) आयएसआय (ISI) मार्क असलेल्या हेल्मटची विक्री करत आहेत. अशा प्रकारे बेकायदेशीर आयएसआय मार्क हेल्मेटची विक्री करत असाल किंवा खरेदी करत असाल तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई (Legal action) होऊ शकते. देशात कोरोडो हेल्मेट ही दुय्यम दर्जाची असून 1 जून 2021 पासून यावर बंदी घातली आहे.
रस्ते सुरक्षेच्या (Road safety) दृष्टीने आणि अपघात (Accident) कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. हा नियम न पाळणाऱ्यांना 5 लाखांचा दंड आणि 1 वर्षाचा कारावास भोगावा लागणार आहे. जो ISI सर्टिफाईड नसलेले हेल्मेट उत्पादन करेल किंवा त्याची विक्री करेल त्याला 1 वर्षाची शिक्षा किंवा कमीतकमी 1 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. हा दंड 5 लाखापर्यंत होऊ शकतो. अशा प्रकारचे हेल्मेट वापरणाऱ्यांवर वाहतूक पोलीस (Traffic police) कारवाई करू शकतात. यासाठी आधिपासूनच दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
कृपया हे देखील वाचा:
सोशल प्लॅटफॉर्म्सचा कांगावा कशासाठी ?
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तरला जोशींचे निधन
IPL चे उर्वरित सामने ‘या’ दिवसापासून सुरु होणार; फायनल दसऱ्याला ?, जाणून घ्या
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार ऑक्सिजन सपोर्टवर
काय सांगता ! होय, भुकेलेल्या सापाने गिळली सव्वा किलोची कोंबडी