बहुजननामा ऑनलाइन टीम – गुगल( Google )आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग बनला आहे. इंटरनेटशी संबंधित अनेक अशी कामे आहेत जी गुगलच्या मदतीशिवाय पूर्ण होत नाहीत. तर, अँड्रॉइड स्मार्टफोन यूज करण्यासाठी गुगल अकाऊंट( Google )असणे जरूरी आहे. जर तुम्ही गुगल क्रोम किंवा अँड्रॉइड स्मार्टफोन यूज करत असाल तर तुमच्या सर्व अॅक्टिव्हिटीवर गुगलची नजर आहे. तुम्ही प्ले स्टोरवरून कोणते अॅप डाऊनलोड करता, किंवा कोणत्या वेबसाइटवर जात आहात याचा संपूर्ण डेटा गुगलकडे आहे.
गुगल पोहचू शकते तुमच्या अकाऊंटपर्यंत
पर्सनल सेटिंगमध्ये जाऊन लोकेशन ऑफ केल्याने कंपनीला तुमच्या लोकेशनची माहिती मिळत नाही. परंतु, रिपोर्टनुसार, प्रत्यक्षात असे होत नाही. ज्यावेळी गुगल मॅप ऑन करता, त्यावेळी तुमच्या सध्याच्या ठिकाणाचा स्नॅपशॉट गुगलवर तुमच्या अकाऊंटमध्ये पोहचला जातो.
गुगलवर सर्च करताना सुद्धा कंपनी तुमच्या स्थितीची माहिती जमवते. गुगलच्या अँड्रॅइड डिव्हाइसचे सुमारे दोन अरब यूजर्स आणि जगभरात आयफोनचे करोडो यूजर मॅप किंवा सर्चसाठी गुगलवर विश्वास ठेवतात. परंतु, त्यांची प्रायव्हसी नेहमी धोक्यात असते. तुमच्या प्रत्येक पावलांवर नजर ठेवल्याने प्रायव्हसी नष्ट होण्याचा धोका असतो.
तुमच्या फोनची कॉन्टॅक्ट लिस्टसुद्धा जीमेल अकाऊंटशी लिंक असते. म्हणजे तुमच्या फोनचा प्रत्येक कॉन्टॅक्ट गुगलकडे असतो. अशाच प्रकारे, तुमच्या फोनचे व्हिडिओ आणि फोटोसुद्धा गुगलकडे सिंक होतात. गुगल ते क्लाऊड स्टोरेज म्हणजे गुगल ड्राइव्हवर सेव्ह करते.
गुगल बनला तुमचा पर्सनल असिस्टंट
सध्या बहुतांश अँड्रॉइड यूजर्स गुगल असिस्टंट फिचरचा वापर करत आहेत. या फिचरचा वापर व्हॉइस कमांड किंवा टेक्स्टद्वारे केला जातो. म्हणजे व्हॉइसने तुम्ही कोणतीही गोष्ट सर्च करू शकता. मात्र, तुम्ही दिलेली प्रत्येक व्हॉइस कमांड गुगलकडे सेव्ह होते. तुम्ही गुगल असिस्टंटला कमांड देऊन काय सर्च करता? आणि तुम्ही त्यास कोणत्या माहितीची आठवण करून देण्यास सांगितले आहे, हे सर्व सेव असते.
गुगलच्या नजरेपासून वाचू शकता का?
गुगल यूजर्सच्या सिक्युरिटीसाठी खुप अलर्ट असते. यासाठी गुगल आपल्या यूजर्सला ऑपशन देते की, ज्याद्वारे ते चेक करू शकतात की, तुमच्या गुगल अकाऊंटवर कोण-कोणते डिव्हाइस काम करत आहेत.
सोबतच जर तुम्ही एखाद्या डिव्हाइसवर लॉग इन करून लॉग आऊट करण्यास विसरलात, तर सेटिंग्जपेजवर जाऊन पर्सनल डेटा सिक्युर करणे चांगली कल्पना आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गुगलला कोणत्याही प्रकारे तुमच्या लोकेशनची माहिती जमवण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही ’वेब अँड अॅप अॅक्टिव्हिटी’ ला ऑफ करू शकता.