मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सध्या बँकेशी संलग्न असलेल्या सर्व क्षेत्रात पॅन कार्ड (PAN card) हे महत्वाचे असते. आता बँकेचे अकॉउंट सुरु करण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक असतं. अनेक व्यवसायाशी निगडीतही पॅन कार्ड हे दस्तऐवज आवश्यक आहे. पॅन कार्ड असेल तर अनेक पैशासंबंधी व्यवहार हे ग्राह्य मानले जातात. तसेच यामुळे कोणत्याही आर्थिक व्यवहारामध्ये अडचण येत नाही.
तसेच, ज्या व्यक्तींनी अजून पॅन हा आधार क्रमांकाशी जोडलेला नसेल तर अगोदर हे लिंक करून घ्या. तर पॅन कार्डला आधार क्रमांक लिंक करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२१ आहे. तसेच अंतिम मुदत ३१ मार्च असल्याने जे व्यक्ती ह्या तारखेपर्यंत लिंक करणार नाहीत. त्यांचे पॅनकार्ड १ एप्रिल २०२१ पासून डिअॅक्टिव्हेट (Deactivate) केलं जाणार आहे. यामुळे पण कार्ड बंद पडणार आहे. पण कार्ड बंद पडल्यामुळे नंतर सुरु करण्यासाठी दंड भरवा लागणार आहे. दरम्यान सध्या आयकर विवरण दाखल करण्यासाठी पॅन आधारही लिंक कारण आवश्यक आहे. याची अंतिम मुदत ही ३० जून २०२० होती, आता ३१ मार्च २०२१ करण्यात आली.
लिंक नाही केल्यास इतका दंड-
आयकर विभागाच्या माहितीनुसार, ३१ मार्च २०२१ नंतर कोणतेही बाद झालेले पॅनकार्ड जर वापरले तर प्राप्तिकर कलम २७२ बी अंतर्गत १० हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो. त्यामुळे जर करदात्यांनी ३१ मार्चपर्यंत पॅन आणि आधार कार्ड लिंक नाही केल्यास पॅनकार्ड बाद होऊ शकते.
पॅनकार्ड रद्द झाल्यावर ह्या येणार अडचणी-
मागील वर्षी सप्टेंबरमध्ये सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारची आधार योजना घटनात्मक कायदेशीर म्हणून घोषित केली होती. महत्त्वाचं म्हणजे वैध पॅन कार्डशिवाय रिटर्न भरणंदेखील शक्य नाही. जर पॅन कार्ड आधारशी लिंक नसेल तर ते अवैध ठरवले जाईल आणि त्याचा काही उपयोगही होणार नाही.
पॅनकार्ड असे लिंक करा आधार कार्डशी-
आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट incometaxindiaefiling.
नंतर तुम्हाला आधार लिंक करण्याच्या पर्यायावर क्लिक करा.
तुमचा पॅन क्रमांक,आधार क्रमांक, आणि तुमचे नाव बॉक्समध्ये भरा.
यानंतर कॅप्चा कोड बॉक्समध्ये भरा.
सर्व माहिती झाल्यावर आधारशी लिंक या पर्यायावर क्लिक करा.