नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खेळाडूंशी केलेल्या वार्षिक कराराची यादी जाहीर केली असून त्यामध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला स्थान देण्यात आलेले नाही. याअगोदर धोनीला सलाना कराराबरोबर ‘अ’ गटात स्थान देण्यात आले असताना नवीन वर्षात जाहीर झालेल्या नव्या करारात त्याचे नाव कोणत्याही श्रेणीत समाविष्ट केलेले नाही. नवदीप सैनी, मयंक अग्रवाल, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर आणि दीपक चहर या पाच नव्या खेळाडूंची नावे देण्यात आली आहेत.
बीसीसीआयने ग्रेड ए+, ग्रेड ए, ग्रेड बी आणि ग्रेड सी या चार श्रेणीत खेळाडूंना विभागले आहे. ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० पर्यंत हा करार असून त्यानंतर बीसीसीआय पुन्हा नव्या कराराची घोषणा करणार आहे. ग्रेडनुसार खेळाडूंचा पगारही कमी असणार आहे. त्यात ग्रेड ए+ खेळाडूंना ७ कोटी, ग्रेड ए खेळाडूंना ५ कोटी, ग्रेड बी खेळाडूंना ३ कोटी आणि ग्रेड सी खेळाडूंना १ कोटी रुपये असते मानधन मिळणार आहे.
धोनी बऱ्याच दिवसांपासून संघाबाहेर होता. त्याने शेवटचा सामना न्यूझीलंडविरुद्ध इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये खेळाला होता. तो एक उपांत्य सामना होता, ज्यात टीम इंडियाला विश्वचषकातून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर धोनीच्या सेवानिवृत्त होण्याविषयी अडथळे सुरु होते. पण आता बीसीसीआयने धोनीला त्याच्या वार्षिक करारामधून वगळल्याने त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे.
कोणत्या खेळाडूला कोणत्या प्रकारात स्थान-
ग्रेड ए+- विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह
ग्रेड ए- आर अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, शिखर धवन, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, कुलदीप यादव, ऋषभ पंत
ग्रेड बी- रिद्धिमान साहा, उमेश यादव, युजवेंद्र चहल, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल
ग्रेड सी- केदार जाधव, नवदीप सैनी, दीपक चहर, मनीष पांडे, हनुमा विहारी, शार्दुल ठाकुर, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर