बारामती : बहुजननामा ऑनलाइन – Baramati accident | बारामती-पाटस रस्त्यावर (Baramati-Patas road) भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. येथील सोनवडी सुपे फाट्यावर भरधाव ट्रकने टुव्हिलर वरील दोघांना चिरडले आहे. या झालेल्या भीषण अपघातात (Baramati accident) टुव्हिलरवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यु (Died) झाला आहे. ही घटना (18 नोव्हेबर) रोजी सकाळी 11.15 च्या दरम्यान घडली. काळूराम गणपत लोंढे (वय 60) शकूबाई काळूराम लोंढे (वय 55 रा. देऊळगाव रसाळ ता. बारामती) असं दुर्दैवी मृत्यु झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत माहिती अशी, गुरूवारी सकाळच्या दरम्यान माल ट्रक (क्रमांक एम. एच. 18 बी.जी. 0814) हा पाटसकडून बारामतीकडे भरधाव वेगाने निघाला होता. याचवेळी सोनवडी सुपे फाट्यावर दुचाकी गाडी (नंबर एम. एच 42 बी. सी. 8234) बारामतीच्या दिशेने निघाली होती. यावेळी माल ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले. अपघातानंतर ट्रकचा चालक व क्लिनर पळून गेले. या आपघातात मालाने भरलेल्या ट्रकखाली दुचाकी आणि पती- पत्नी दोघेही अडकले.
दरम्यान, त्याक्षणी स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिस मित्रानी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, ट्रकमध्ये माल असल्याने आणि ट्रक चारीत अडकल्याने जाग्यावरुन हलू शकला नाही. या घटनेबाबात माहिती पोलिसांना दिली. त्यावेळी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर, पोलिसांनी क्रेनच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. याप्रकरणी पुढील तपास बारामती तालुका पोलीसचे (Baramati Taluka Police) सहाय्यक फौजदार योगेश लंगुटे (Yogesh Langute) करीत आहेत.
Web Title :- Baramati Accident | Bad luck! Terrible accident on Baramati-Patas road; Husband and wife died on the spot