Bapusaheb Pathare | बापूसाहेब पठारेंनी शरद पवारांची भेट घेत दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा; यंदा कोणत्या पक्षाचे दिवाळे निघणार? कोण विजयाचे फटाके फोडणार? राजकीय वर्तुळात चर्चा

November 3, 2024

बारामती: Bapusaheb Pathare | गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने गोविंद बाग (Govindbaug Baramati) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत दिवाळी पाडवा कार्यक्रम होत असतो. यात राज्यभरातून अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते हे बारामतीत येऊन पवारांची भेट घेत असतात.

दरम्यान वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे (Vadgaon Sheri Assembly Election 2024) राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी दिवाळीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट घेवून दिवाळीच्या शुभेच्या दिल्या. यावेळी खासदर सुप्रिया सुळे (Supriya Sule), बारामती विधानसभेचे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) अधिकृत उमेदवार युगेंद्र पवार (Yugendra Pawar) आणि इतर कार्यकर्ते मंडळी उपस्थित होते.

महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक यंदा ऐन दिवाळीत आहे. या निवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षाचे दिवाळे निघणार आणि कोण विजयाचे फटाके फोडणार हे २३ नोव्हेंबरला कळणार आहे. मात्र दिवाळीत राजकीय भेटीगाठींचा उत्साह वाढल्याचे चित्र आहे.