Bapu Pathare MLA | आमदार पठारे यांच्याकडून 2.5 तास पाण्यासाठी महापालिका प्रशासनाचा ‘दशक्रिया विधी’ घालून निषेध; पालिका प्रशासनाकडून मागण्या मान्य

Bapu Pathare MLA | MLA Pathare protests the 'Dashakriya Ridhi' of the municipal administration for 2.5 hours for water; Demands accepted by the municipal administration

भैय्यासाहेब जाधव व संजय देशमुख यांनी अर्धमुंडन करून नोंदवला निषेध

पुणे : Bapu Pathare MLA | वडगावशेरी मतदारसंघातील नागरिकांना दररोज अडीच तास पाणी मिळण्यासाठी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेवर ‘धडक मोर्चा’ काढण्यात आला. मतदारसंघातील विविध भागांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग घेतला.

आंदोलनादरम्यान पाणी, रस्ते, आरोग्य, उद्याने, स्मशानभूमी, लोहगाव, वाघोली सह समाविष्ट गावांचा विकास आरखडा इ. संदर्भातील मागण्या पालिका प्रशासनासमोर ठेवण्यात आल्या होत्या. सातत्याने पाठपुरावा करूनही संबंधित मागण्या पूर्ण होत नसल्याने आमदार पठारे यांनी महापालिका प्रशासनाचा दशक्रिया विधी करून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. जनतेच्या प्रश्नांबाबत महापालिका प्रशासनाला गांभीर्य नसल्याचा आरोप आमदार पठारे यांनी यावेळी केला.

आमदार बापूसाहेब पठारे यांच्या पुढाकाराने पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासमवेत मागण्यांवर चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान, सर्व मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. तसेच, मतदारसंघातील विकासकामांचा पाहणी दौरा करण्याचेही आश्वासन दिले. विशेषतः पाणीपुरवठा नियमित करण्यासह गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या पाण्याच्या टाक्यांची कामे जलदगतीने पूर्ण करण्यात येतील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. तसेच, रस्ते, रुग्णालये, स्मशानभूमी, ड्रेनेज, नालेसफाई, मिळकत कर या कामांबाबत तपशीलवार चर्चा करण्यात आली. तसेच, नजीकच्या काळात यावर बैठक घेण्याचेही त्यांनी नमूद केले.

मागण्यांच्या संदर्भाने लवकरच प्रत्यक्ष पाहणी करून सर्व प्रलंबित कामे पूर्ण केली जातील, असेही महापालिका आयुक्तांकडून सांगण्यात आले आहे. आमदार पठारे म्हणाले, “नागरिकांच्या सहकार्याने आंदोलन यशस्वी झाले आहे. प्रशासनाने दिलेली आश्वासने आम्ही नोंदवून ठेवली आहेत. ती प्रत्यक्षात उतरवली जात आहेत की नाही, यावर आम्ही स्वतः लक्ष ठेवू. नागरिकांच्या मूलभूत सुविधांची पूर्तता होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.”

आंदोलनातील मान्य झालेल्या मागण्या

  • दररोज किमान अडीच तास नियमित पाणीपुरवठा व्हावा व सुरू असलेल्या पाण्याच्या टाक्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत.
  • प्रलंबित रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करून वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवावा.
  • मतदारसंघातील स्व. राजीव गांधी, कळस, लोहगाव, धानोरी, वडगावशेरी व खराडी येथील महापालिका रुग्णालयांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात.
  • लोहगाव-वाघोली भागातील ड्रेनेज व पावसाळी पाण्याच्या लाईनची कामे पूर्ण करावीत.
  • येरवडा, धानोरी, कळस, वडगावशेरी, लोहगाव भागात पूरस्थिती टाळण्यासाठी नाले व जलनिस्सारण कामे तातडीने राबवावीत.
  • डी.पी. व आर.पी. मधील रस्ते तसेच खराडी–शिवणे रस्ता, महत्त्वाचे पूल जसे की विश्रांतवाडी चौक, बिंदू माधव ठाकरे चौकातील पुलांची कामे लवकर पूर्ण करावीत.
  • महापालिकेच्या ताब्यातील गार्डनकरीता आरक्षित जागांवर गार्डन विकसित करावीत.
  • लोहगाव, धानोरी, वडगावशेरी, वाघोली भागातील स्मशानभूमी विकसित कराव्यात.
  • लोहगाव व वाघोली गावांचा विकास आराखडा तातडीने मंजूर करावा.
  • महापालिकेच्या मिळकतकर धारकांसाठी अभय योजना राबवून नागरिकांना दिलासा द्यावा.

आंदोलन प्रसंगी ज्येष्ठ नेते प्रकाश म्हस्के, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नानासाहेब आबनावे, संतोष भरणे, वसुंधरा उबाळे, मीना सातव, माजी नगरसेवक राजेंद्र शिरसाट, सुनिल मलके, महेंद्र पठारे, हनिफ शेख, डॅनियल लांडगे, संतोष आरडे, भैय्यासाहेब जाधव, संजय देशमुख, रेखा टिंगरे, चंद्रकांत टिंगरे, सचिन भगत, किशोर विटकर, विशाल मलके, राजेंद्र खांदवे, शिवदास उबाळे, माजी उपसरपंच प्रितम खांदवे, अ‍ॅड. नानासाहेब नलावडे, सागर खांदवे, शिवानी माने, विक्रांत भोसले, पम्मी परांडे, दत्ता परांडे, संजय गलांडे, अ‍ॅड. रेगे, कमल जगदाने, अरुण पठारे, संजय माने, केशव राखपसरे, प्रकाश सोनवणे, अजहर खान, सुभाष ठोकळ, विल्सन चंदेवाल, सुभाष काळभोर, जालिंदर कांबळे, संकेत गलांडे, निखिल गायकवाड, संतोष सुकाळे, निलेश जठार व मतदारसंघातील नागरिक उपस्थित होते.