नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ज्यांना घर खरेदी करायचं आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. घरांच्या विक्रीत वाढ व्हावी आणि इकॉनॉमीचा वेग वाढावा यासाठी मोदी सरकार आता 59 मिनिटांत लोन देण्यासाठी तयारी सुरु करणार आहे. अर्थ मंत्रालयाला बँकांकडून एक प्रस्ताव मिळाला आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. सरकारी बँकांचे चेअरमन, एमडी आणि सीईओंसोबत बैठकीत अर्थ मंत्री निर्मला सितारमण यांना हा प्रस्ताव मिळाला आहे.
बिजनेस लोनच्या धर्तीवर मिळणार कर्ज
एका वृत्तपत्राने दिलेल्या रिपोर्टनुसार, अर्थ मंत्रालय या प्रस्तावावर फोकस करत आहे. या बैठकीत वित्त सचिव राजीव कुमार हे देखील उपस्थित होते. ही सुविधा फक्त छोट्या व्यापाऱ्यांना मिळत होती. जे psbloansin59minutes.com वर सहज एक कोटींपर्यंतच्या कर्जासाठी अर्ज करू शकतात.
कार आणि घर खरेदीसाठी लोन
बँकांनी प्रस्ताव दिला आहे की, याप्रकारचं एक पोर्टल ग्राहकांसाठीही सुरु केलं जावं, ज्यामुळे त्यांना सहज होम, ऑटो आणि पर्सनल लोन मिळेल. यामुळे अर्थव्यवस्थेची गती वाढेल आणि मागणी वाढल्याने ऑटो, रियल इस्टेट आणि इलेक्ट्रॉनिक्स सेक्टर्सला जास्त फायदा मिळेल.
बँकांनी वाढवली कर्जाची मर्यादा
MSMEला 59 मिनिट लोन योजनेअंतर्गत आता 5 कोटींपर्यंत कर्ज मिळू शकेल आणि लोन अमाऊंट 8 वर्किंग डेजमध्ये अकाऊंटमध्ये येईल. एसबीआयसहित पाच सरकारी बँकांनी कर्जाची मर्यादा वाढवली आहे. मोदी सरकारने नोव्हेंबर 2018 मध्ये एमएसएमई क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी योजनेची सुरुवात केली होती.
या बँकांनी वाढवली कर्जाची रक्कम
पीएबीने ‘लोन इन 59 मिनिट’ योजनेअंतर्गत एमएसएमईला 1 कोटींचं कर्ज उपलब्ध करून देण्याची सुविधा दिली होती. व्यापाऱ्यांच्या अर्जांना एका तासाच्या आत स्विकारत लोन पास केलं जातं आणि 8 वर्किंग डेजमध्ये कर्जाची रक्कम अर्जदाराच्या खात्यात जमा होते. या प्रकारच्या कर्जावरील व्याजाची सुरुवात 8.5 टक्क्यांनी होते.