नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Banking New Rules । पुढचा महिना खूप बदल घेऊन येईल. 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) बजेट (Budget 2022-23) सादर करतील. यामुळे देशाची अर्थव्यवस्था बदलणार असली तरी सर्वसामान्यांच्या जीवनावरही याचा परिणाम होणार आहे. बजेट (Aam budget 2022) व्यतिरिक्त जे महत्त्वाचे म्हणजे 1 फेब्रुवारीपासून काही बँकाही त्यांचे नियम बदलणार (Banking New Rules) आहेत.
SBI बँक 1 फेब्रुवारीपासून पैसे ट्रान्सफर करण्याच्या नियमात बदल करणार आहे. हि बँक IMPS द्वारे रु. 2 लाख ते रु. 5 लाखांपर्यंतचे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी रु. 20 + अधिक GST शुल्क आकारेल. ऑक्टोबर 2021 मध्ये, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने IMPS द्वारे व्यवहारांची रक्कम 2 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये केली आहे. रिझर्व्ह बँकेने IMPS द्वारे व्यवहारांची मर्यादाही 2 लाखांऐवजी 5 लाख रुपये एका दिवसात वाढवली आहे.
बँक ऑफ बडोदाचे नियम बदलणार
बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda) देखील 1 फेब्रुवारीपासून चेक क्लिअरन्स शी संबंधित नियम बदलत आहे. 1 फेब्रुवारीपासून चेक पेमेंटसाठी, ग्राहकांना पॉजिटीव्ह सिस्टमला फॉलो करावे लागेल. म्हणजेच चेकच्या संबंधित माहिती पाठवावी लागेल, तरच चेक क्लिअर होईल. हे बदल 10 लाख रुपयांवरील चेक क्लिअरन्ससाठी आहेत. (Banking New Rules)
PNB चे नियम होतील कडक
पंजाब नॅशनल बँक (PNB) जे नियम बदलणार आहे त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. तुमच्या खात्यात पैसे नसल्याने हप्ता किंवा गुंतवणूक अयशस्वी झाल्यास, तुम्हाला 250 रुपये दंड भरावा लागेल. आतापर्यंत हा दंड 100 रुपये होता.
गॅस सिलेंडरची किंमत
LPGच्या किमती प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला निश्चित केल्या जातात. यावेळी 1 फेब्रुवारीला सिलिंडरच्या दरात काय चढ-उतार होतात हे पाहावे लागेल. दर वाढले तर त्याचा परिणाम नक्कीच तुमच्या खिशावर होईल.
बजेट सादर केले जाईल
अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला बजेट सादर करणार आहेत. यामध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स (personal income tax rates) संबंधित नियमांमध्ये बदल होऊ शकतात. बजेट तुमच्या आर्थिक जीवनात आणखी बरेच बदल घडवून आणू शकते.
Web Title :- Banking New Rules | banking related many rules will change on february 1 know detail
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Income Tax Slab | आयकर भरण्याची ‘ही’ आहे अंतिम तारीख; उशीर झाल्यास करदात्यावर खटला? जाणून घ्या
LIC IPO | एलआयसीच्या पॉलिसीधारकांना IPO मध्ये किती मिळणार लाभ? सगळ्यात आधी करा ‘हे’ काम पूर्ण