करमाळ्यात बँक ऑफ महाराष्ट्रच्या इमारतीचा स्लॅब कोसळून १ ठार, २० ते २५ जण अडकल्याची भिती

करमाळा बहुजननामा ऑनलाईन – सोलापूर जिल्ह्यातील करमाळा शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या इमारतीचा स्लॅब कोसळून एक जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर २० ते २५ जण जखमी झाले आहेत. यातील १५ जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे.
करमाळ्यामध्ये महिंद्र नगर भागात राजेश दोषी यांची तीन मजली इमारत आहे. या इमारतीच्या खालच्या बाजूला बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा आहे. तळमजल्यावर बँक ऑफ महाराष्ट्र तर पहिल्या मजल्यावर रुग्णालय आहे. आज दुपारी बाराच्या सुमारास पहिल्या मजल्यावरील स्लॅब कोसळला. त्यात रुग्णालयातील रुग्ण, तळमजल्यारील बँकेचे ग्राहक, कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकले. त्यात एकाचा मृत्यू झाला असून १० ते १२ जण जखमी झाले आहेत. जखमींना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे.
Comments are closed.