बहुजननामा ऑनलाइन टीम – राज्य सरकारच्या सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बँक खात्याबाबत(Bank account ) एक धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. या सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या खात्यात पेन्शनचे किती पैसे जमा होतात, खाते क्रमांक काय याची माहिती कोणालाही बघता येते. यामुळे या खात्यांच्या(Bank account ) गोपनीयतेवर आता सवाल उपस्थित होत आहे.
महाराष्ट्र सरकारच्या sevaarth.mahakosh. gov.in या संकेतस्थळावर गेल्यावर युजरनेम आणि पासवर्ड सबमिट केल्यानंतर कोणालाही ट्रेझरी ऑफिस, बँकेचे नाव, खातेदाराचे नाव, कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंची माहिती हवी आहे. हे सगळं सबमिट केलं की बँक खात्याचे डिटेल्स मिळतात, त्याशिवाय बँक खात्याचा क्रमांक सुद्धा प्राप्त होतो.
हॅकर्सकडून फसवणूक होण्याची भीती
राज्य सरकारच्या या संकेतस्थळावर बँक खाते क्रमांक कोणालाही सहज उपलब्ध होत असल्याने हॅकर्स अथवा इतर कोणाकडूनही याचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता आहे. संगणकामार्फत आपणास एखादी मिळवायची असेल तर त्यासाठी वापरकर्त्यांची ओळख पटल्याशिवाय त्याला माहिती देण्यात येऊ म्हणून ऑथेंटिकेशन प्रोटोकॉल म्हणून अत्यंत महत्वाचा प्रकार आहे. हा साधारणतः दोन, तीन घटकांत असतो. या संकेतस्थळाशी जोडण्यासाठी आवश्यक असतो. या प्रणालीत फक्त बँक खाते क्रमांक हा एकच प्रमाणीकरण घटक होता, तोही आता काढण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आर्थिक गोपनीय माहितीवर गदा आली आहे.
पेन्शनची माहिती सहजरित्या उपलब्ध व्हावी, अशी निवृत्तीवेतन कर्मचाऱ्यांची मागणी होती. म्हणून सोपी पद्धत आणली गेली, मात्र त्यात गोपनीयता धोक्यात येणार असेल तर विधी व न्याय विभागाचा सल्ला घेऊन फेरआढावा घेण्यात येईल. व उणिवा असल्यास त्यात दूर केल्या जातील, अशी माहिती लेख व कोषागारे विभागाचे संचालक जयगोपाल मेनन यांनी दिली.