Baner Balewadi Fire Station | बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी; बहुप्रतीक्षित फायर स्टेशन अखेर सुरू

पुणे : Baner Balewadi Fire Station | बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत गरजेची आणि बहुप्रतीक्षित फायर स्टेशन सुविधा अखेर सुरू झाली आहे. या फायर स्टेशनसाठी २०१५ पासून संघर्ष यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी लढा सुरू केला होता आणि आज त्या संघर्षाला यश मिळालं आहे.
या परिसरात दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या, उंच इमारतींची संख्या आणि संभाव्य आपत्ती अथवा अपघाताच्या पार्श्वभूमीवर फायर स्टेशन ही प्राथमिक गरज बनली होती. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही सुविधा अत्यंत आवश्यक होती.
२०१८-१९ मध्ये या फायर स्टेशनच्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली होती. दीड वर्षांपूर्वीच काम पूर्णत्वास आलं होतं, मात्र प्रशासकीय विलंबामुळे सेवा सुरू होण्यासाठी वेळ लागला. २४ डिसेंबर २०२४ रोजी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन तातडीने फायर स्टेशन सुरू करण्याची ठाम मागणी करण्यात आली होती. त्यानंतर त्वरित कारवाई करून ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
या फायर स्टेशनमध्ये अत्याधुनिक उंच शिडीसह २ अग्निशामक गाड्या, तसेच अधिकारी आणि कर्मचारीवर्गाचीही पूर्ण उपलब्धता प्रशासनाने केली आहे. या सुविधेमुळे बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेला मोठा आधार मिळाला आहे.
ही सुविधा म्हणजे संघर्ष यात्रा, नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्याने मिळालेलं सामूहिक यश असल्याचं अमोल बालवडकर यांनी सांगितलं. आज बाणेर अग्निशमन केंद्राला भेट देताना केंद्रप्रमुख शिवाजी मेमाणे, प्रभारी अधिकारी प्रमोद मरळ, तसेच फायरमन आणि अधिकारी वर्ग उपस्थित होता.