बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार बॉबी देओल (Bobby Deol) स्टारर आश्रम (Aashram) या वेब सीरिजचा पहिला सीजन प्रचंड गाजला. यानंतर आता लवकरच याचा दुसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आश्रम 2 (Aashram 2) चा ट्रेलरही नुकताच रिलीज करण्यात आला आहे. यावरून आता नवा वाद(Ban ) होताना दिसत आहे. करणी सेनेनं (Karni Sena) या वेब सीरिजवर आक्षेप(Ban ) घेतला आहे. या सेनेनं डायरेक्टर प्रकाश झा (Prakash Jha) यांना लीगल नोटीसही बजावली आहे.
आश्रम 2 चा ट्रेलर आणि या वेब सीरिजच्या संपूर्ण प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करणी सेनेनं केली आहे. ही सीरिज हिंदुंच्या भावना दुखवणारी आहे. येणाऱ्या पिढीला हिंदू धर्माची नकारात्मक प्रतिमा दाखवण्याची प्रयत्न केला गेला आहे. ट्रेलरमध्ये हिंदू संस्कृती, परंपरांना चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आलं आहे असा आरोप महाराष्ट्राच्या करणी सेनेनं केला आहे.
काय म्हणतात प्रकाश झा ?
करणी सेनेच्या मागणीनंतर यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश झा म्हणाले, करणी सेनेच्या मागणीवर निर्णय घेणारा मी कोण आहे ? आमच्या सीरिजच्या पहिल्या सीझनला 400 मिलियन पेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत. माझ्या मते, नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा निर्णयही आपण प्रेक्षकांवर सोडायला हवा. आपण हा निर्णय लोकांवर सोडू शकतो काय ? असा सवालही त्यांनी केला आहे. एका मुलाखतीत ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं आहे