Balasahebanchi Shivsena | ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाला (शिंदे गट) मिळाले निवडणूक चिन्ह

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Balasahebanchi Shivsena | शिवसेनेच्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वादावर निवडणूक आयोगाने (Election Commission) हंगामी निर्णय देत पडदा टाकला आहे. शिवसेना (Shivsena) पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह गोठविण्यात आले आहे. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे गटाला नावांचे आणि चिन्हांचे काही पर्याय देण्यात आले होते. (Balasahebanchi Shivsena)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
त्यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव स्वीकारले, तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ (Balasahebanchi Shivsena) नाव मिळाले आहे. ठाकरे यांच्या गटाला ‘मशाल’ (Mashal Symbol) हे नवीन पक्षचिन्ह देखील मिळाले होते. परंतु अद्यापपर्यंत शिंदे यांच्या गटाला कोणतेही पक्ष चिन्ह मिळाले नव्हते. अखेर काही वेळापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या गटाला ढाल – तलवार (Dhal Talwar) हे नवीन निवडणूक चिन्ह मिळाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाला ढाल-तलवार चिन्ह मिळाल्याने आता त्यांच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.
Election Commission of India allots the 'Two Swords & Shield symbol' to Eknath Shinde faction of Shiv Sena; they were allotted the name 'Balasahebanchi ShivSena' yesterday. pic.twitter.com/2Xi2C5TS4T
— ANI (@ANI) October 11, 2022
गेले तीन महिने चाललेला हा वाद अखेर निकालात निघाला आहे.
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण आता कायमस्वरुपी कालबाह्य झाले आहेत.
यापुढे सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) प्रलंबित याचिकांवरील निर्णय लागेल तेव्हा लागेल.
पण तोपर्यंत शिवसेना फुटली असून आता एकनाथ शिंदे यांना एखाद्या पक्षाप्रमाणे नाव आणि चिन्ह मिळाले आहे.
Web Title :- Balasahebanchi Shivsena | Election Commission of India allots the ‘Two Swords & Shield symbol’ to Eknath Shinde faction of Shiv Sena; they were allotted the name ‘Balasahebanchi ShivSena’
हे देखील वाचा :
Pune Crime | दुचाकीला कट मारल्याच्या वादातू वाहनचालकाला लुटले
Pravin Darekar | मराठा समाजाच्या प्रश्नावर आमचे सरकार सकारात्मक – आमदार प्रवीण दरेकर
Comments are closed.