मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – विधानसभेतील विरोधी पक्षनेते बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसनं महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच, त्यांच्यासोबत ५ कार्याध्यक्षांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षात पहिल्यांदाच महाराष्ट्रासाठी ५ कार्याध्यक्ष नेमले आहेत. त्यामध्ये विदर्भातील दलित नेते नितीन राऊत यांची वर्णी लागली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी राज्यातल्या या नव्या कार्यकारिणीला मंजुरी दिली आहे.
लोकसभेतील पराभवानंतर अशोक चव्हाण यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे अशोक चव्हाण यांची जागी कोणाची नियुक्ती होणार याची चर्चा होती.नव्या कार्याकारणीत अशोक चव्हाण यांच्यावर कोणतीच जबाबादारी टाकण्यात आली नाही. त्यामुळे अशोक चव्हाणांविषयी काँग्रेस नेमिकी कोणती भुमिका घेते आहे, हे अजुनही स्पष्ट झाले नाही. दरम्यान बाळासाहेब थोरात यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत सुरवातीपासूनच आघाडीवर होते. मात्र प्रदेशाध्यक्षांसोबत पाच कार्याध्यक्षांची निवड करुन काँग्रेसने सर्वांनाच आश्चर्यचकीत केले आहे. प्रादेशिक समतोल सांभळत या नियुक्त करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र काँग्रेसची नवी कार्यकारणी पुढील प्रमाणे
- बाळासाहेब थोरात – प्रदेशाध्यक्ष
- नितीन राऊत – कार्याध्यक्ष
- बसवराज पाटील – कार्याध्यक्ष
- विश्वनाथ कदम – कार्याध्यक्ष
- यशोमती ठाकूर – कार्याध्यक्ष
- मुझफ्फर हुसेन – कार्याध्यक्ष
- सुशीलकुमार शिंदे – समन्वय समिती अध्यक्ष
- पृथ्वीराज चव्हाण – जाहीरनामा समितीचे अध्यक्ष
- नाना पटोले – प्रचार समिती अध्यक्ष
- रत्नाकर महाजन – प्रसार समिती अध्यक्ष
- राजेंद्र दर्डा – माध्यम समिती अध्यक्ष
- शरद रणपिसे – निवडणूक व्यवस्थापन समिती अध्यक्ष