बहुजननामा ऑनलाईन – आजकाल सगळीकडे जेवणापासून तर रोजच्या वापरातील सर्व वस्तू ऑनलाईन मागवून घेण्याचा जणूं एक ट्रेंडच आला आहे. सध्या तर कोणता सण असेल तरीही अनेकजण पदार्थांपासून तर कपड्यापर्यंत ऑनलाईन ऑर्डर करताना दिसत आहे. त्यातच आता बकरी ईद हा सण जवळ आला आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाचे लोक बाजारात जाऊन बकरा खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन पोर्टलला जास्त महत्व देत आहेत. त्यामुळे या बकरी ईदला मुस्लिम बांधवाना बाजारात जाण्याची गरज नाही. कारण ते ३ लाखांपर्यंतचे बकरे आता ऑनलाईन खरेदी करू शकणार आहेत.
बकरी ईदमुळे सध्या बाजारात बकऱ्याचे भाव खूप वाढलेले दिसत आहेत या वाढत्या भावाला कंटाळून अनेकजण आता ऑनलाईन बकरा खरेदी करण्याकडे वळले आहे. इथे त्यांना ५ हजारांपासून तर लाखो रुपयांपर्यंत त्यांना वाटेल तो बकरा ते खरेदी करू शकणार आहेत.
दरम्यान बकरी ईदच्या मुहूर्तावर मुस्लिम बांधव आपल्या परिस्थितीनुसार जनावरांची कुर्बानी देत असतात. त्यात बकऱ्यांची संख्या जास्त असते. या पार्श्वभूमीवर सध्या अनेक मुस्लिम बांधव ओएलएक्स किंवा दुसऱ्या शॉपिंग पोर्टल वरून बकरे खरेदी करताना दिसत आहेत. यासाठी तयार केलेली गोट इंडिया. कॉम ही लोकप्रिय वेबसाईट आहे. या सगळ्या वेबसाईटवर पंजाबीपासून ते दुम्बा पर्यंत आणि तुर्कीपासून राज्यस्थानी पर्यंत सर्व बकरे मिळत आहेत.
सर्वात महत्वाचं म्हणजे आपण बाजरातून बकरा खरेदी केला आणि तो घरच्यांना आवडला नाही. तर तो पुन्हा वापस करता येत नसे पण या ऑनलाईन वेबपोर्टल वर तुम्ही बकरा वापस करून दुसरा पण घेऊ शकतो.