‘फुलराणी’ सायना नेहवालचा भाजपात प्रवेश
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगप्रसिद्ध बॅडमिंटनपटु आणि फुलराणी सायना नेहवाल हिने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी सायना नेहवाल हिला भाजपाचे सदस्यत्व दिले.
Delhi: Badminton Player Saina Nehwal joins BJP in the presence of Party's National General Secretary Arun Singh pic.twitter.com/uXPSJmDVcn
— ANI (@ANI) January 29, 2020
सायनाच्या अगोदर रेसलर योगेश्वर दत्त आणि बबीता फोगट यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. लंडन ऑलिपिंकमध्ये कांस्य पदक पटकाविणारी सायना आज आपली राजकीय कारकिर्द सुरु करत आहे. भाजपाच्या दिल्लीतील कार्यालयात तिला पार्टी सदस्यत्व देण्यात आले.
हैदराबादमध्ये सध्या राहणाऱ्या सायना हिचा जन्म हरियाणातील हिसारमध्ये १९ मार्च १९९० मध्ये झाला आहे. वर्ल्ड बॅडमिंटन रॅकिंगमध्ये २३ मे २०१५ मध्ये ती जगात नंबर वन बनली होती. जगात हे स्थान मिळविणारी ती पहिली भारतीय खेळाडु आहे. सायना ने २२ सुपर सीरीज आणि ग्रँड प्रिक्स पदक मिळविले आहेत. सध्या सायना तिचा नेहमीचा खेळ खेळू शकत नाही. टोकिओ ऑलंपिकमध्ये तिला अजून कोटा मिळू शकलेला नाही.
Visit : bahujannama.com
Comments are closed.