नवी दिल्ली: वृत्तसंस्था – अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये संयुक्त अभ्यास करत असलेले भारत आणि अमेरिकी सैनिकांच्या डान्सचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्या डान्स मध्ये ते ‘बदलूराम का बदन जमीन के नीचे है’ या गाण्यावर डान्स करता आहेत आणि सोबतच हे गाणं देखील गाता आहेत. वॉशिंग्टनमधील मैककॉर्ड जॉइंट बेस लेविस येथे आज भारतीय आणि अमेरिकन सैनिक या दिवसांमध्ये संयुक्त अभ्यास करत आहेत.
आसाम रेजिमेंटचे प्रसिद्ध मार्चिंग गीत ‘बदलूराम का बदन जमीन के नीचे है’ गाणं सुरु करता आणि त्यावर डान्स करता आहेत. त्यानंतर हा डान्स व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आसाम रेजिमेंटच्या या गाण्याबद्दल बोलायचे गेले तर हे गाणे रेजिमेंटच्या शहीद बदलुरामच्या शौर्यावर आधारित आहे.
#WATCH Indian and American soldiers sing and dance on the Assam Regiment's marching song ‘Badluram ka badan zameen ke neeche hai’ during Exercise 'Yudhabhyas' being carried out at Joint Base Lewis, McChord in the United States of America pic.twitter.com/6vTuVFHZMd
— ANI (@ANI) September 15, 2019
दुसर्या महायुद्धात, जपानच्या सैन्याशी लढा देताना बदलूराम शाहिद झाले होते. यानंतरही रसद विभागातून त्यांचे नाव हटविण्यात आले नाही, म्हणून त्यांच्या नावावर राशन येत राहिले आणि सैनिकांचे काम चालूच राहिले. हे गाणं तेव्हापासून चर्चेत आले आहे. यावर्षी जानेवारीमध्ये देखील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये सिक्किम बॉर्डरवर जीरो डिग्रीपेक्षा कमी तापमानावर आसाम रेजिमेंटचे जवान या गाण्यावर डान्स करतांना दिसले होते. वॉशिंगटनमध्ये या दिवसांत भारत आणि अमेरिकी सैनिकांमध्ये सगळ्यात मोठा युद्धभ्यास चालू आहे. हा युद्धाभ्यास एका वर्षी भारतात तर दुसऱ्यावर्षी अमेरिका मध्ये आयोजित होतो.