बहुजननामा ऑनलाईन टीम – Bad Habits | रोज सकाळी उठल्यावर आपला दिनक्रम ठरलेला असतो, आधी काय करायचे, मग काय करायचे. सवयींच्या रूपात आपण काही गोष्टी अशा सुद्धा करतो ज्या चांगल्या नसतात. तरीही त्या दिनक्रमाचा एक भाग बनतात. या सवयी विषासारख्या असतात (These Bad Habits Like Poison), ज्या आयुष्य संथ (Slow Life), निगेटिव्ह (Negative Life) बनवतात. यामुळे अनेकदा शरीरात उर्जेची (Energy) कमतरता जाणवते. (Bad Habits)
तुम्ही तुमचा राग (Angry) घरातील लोकांवर आणि कामावर काढू लागता. सर्व काही चुकीचे होऊ लागते. जर तुमच्याबाबतीत असे घडत असेल आणि सर्व काही सुरळीत करायचे असेल, तर येथे सांगितलेल्या सकाळच्या या 5 सवयी सोडा. यानंतर तुमचा दिवस उर्जेने भरलेला असेल.
1. सकाळी उठून आंघोळ न करणे
लोक सकाळी उठल्यानंतर आंघोळ (Bath) करतात कारण यामुळे त्यांना ताजेतवाने वाटते आणि दिवसभर चांगले वाटते. आंघोळीमुळे शरीरात चांगले हार्मोन्स तयार होतात आणि एक नवीन ऊर्जा जाणवते. सकाळी अंघोळ करणे टाळणे ही सवय विषापेक्षा कमी नाही. ती शक्य तितक्या लवकर सोडली पाहिजे.
2. टाळाटाळ करणे
काही लोक असे असतात जे सकाळी उठल्यावर विनाकारण बसतात किंवा इकडे-तिकडे हिंडतात. एकंदरीत त्यांची दिनचर्या गडबडलेली असते आणि कामे पुढे ढकलत राहतात. सकाळी उठल्यानंतर कामाचे नियोजन करून त्यानुसार काम करणे महत्त्वाचे आहे. (Bad Habits)
योजनांना उशीर करू नका, याचा चांगला परिणाम होत नाही. बाहेर जाण्याआधी तुमच्याकडे वेळ असेल तर झाडांना पाणी घालणे, फ्रीज साफ करणे अशी छोटी कामे करू शकता.
3. नाश्ता टाळणे
अनेक लोकांची ही वाईट सवय असते की ते आधी उशिरा उठतात आणि नंतर नाश्त्यात (Breakfast) काहीही न खाता कॉफी (Coffe) किंवा चहा (Tea) पितात. दिवसाची चांगली सुरूवात करण्यासाठी हेल्दी ब्रेकफास्ट खूप आवश्यक आहे. न्याहारीसाठी, तुम्ही अंडी, टोस्ट, ओट्स किंवा काही ताजी फळे खाऊ शकता.
4. फोन स्क्रीन पाहणे
सकाळी उठल्यावर हातात सर्वात पहिली गोष्ट असते ती म्हणजे फोन. विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, परंतु ही सर्वात विषारी सवय आहे, ज्याचा आपल्या डोळ्यांवर वाईट परिणाम होतो.
ही सवय आपल्याला कमी प्रॉडक्टिव्ह बनवते. त्यामुळे ही सवय सोडा, सकाळी उठून थोडे कोमट पाणी प्या, चेहरा धुवा,
बाल्कनीत किंवा खिडकीत जा आणि ताज्या हवेत थोडा वेळ बसा.
एक किंवा दोन तास स्वतःसाठी ठेवा आणि नंतर फोन, सोशल मीडिया, तुमचे मेल या गोष्टी पहा.
5. जागे झाल्यावर नकारात्मक गोष्टींचा विचार करणे
सकाळी उठल्यानंतर मनात कधीही नकारात्मक विचार आणू नका किंवा वाईट गोष्टींचा विचार करू नका.
सकाळी ध्यान करणे चांगले. तुमच्या आयुष्यात असलेल्या चांगल्या गोष्टींसाठी कृतज्ञ रहा आणि आशावादी व्हा.
लक्षात ठेवा की सकाळी मनात येणारा नकारात्मक विचार तुम्हाला नेहमी निराश करतो.
सकाळी उठल्यानंतर तुम्हालाही अशाच काही सवयी असतील तर त्या लवकरात लवकर बदला.
अन्यथा तुमच्या कामासह आयुष्यावर आणि आरोग्यावरही वाईट परिणाम होईल.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Bad Habits | 5 bad morning habits you need to quit now
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
- Nitesh Narayan Rane | नारायण राणे आणि नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल ! दिशा सालियानबाबतच्या वादग्रस्त विधानामुळं FIR
- Mahashivratri 2022 | महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र भिमाशंकर येथे वाहनतळ सुविधा; भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाचे नियोजन
- Power Failure Mumbai Local Trains | मुंबईतील अनेक भागातील वीज ‘गुल’;उपनगरीय रेल्वे सेवेवर परिणाम
- Avoid These 6 Foods in Lunch | सावधान ! लंचमध्ये चुकूनही घेऊ नका ‘या’ 6 गोष्टी, सेवन केल्याने येतो आळस; आजारी सुद्धा पडू शकता