Bachchu Kadu | ‘राऊत यांच्याकडे पुऱ्या महाराष्ट्राचा पीआर कार्ड नाही, त्यांचा अभ्यास कमी’, बच्चू कडूंचा निशाणा; म्हणाले – ‘शिंदे-फडणवीसांविरोधात तगडा उमेदवार देऊ’

मुंबई: Bachchu Kadu | विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election 2024) काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. लोकसभेप्रमाणे आता विधानसभेलाही राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) असा सामना पाहायला मिळणार अशी चर्चा होती. मात्र आता विधानसभेला तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. राज्यात महायुती आणि महविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी तिसऱ्या आघाडीबाबत (Maharashtra Third Front) रणनीती ठरली आहे.

प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू, स्वराज्य संघटनेचे संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Chhatrapati), भारतीय बौद्ध महासभेचे राजरत्न आंबेडकर (Rajratna Ambedkar), स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्यासारख्या इतर छोट्यामोठ्या संघटनांनी एकत्र येऊन नवीन आघाडीची घोषणा केली आहे. दरम्यान शिंदे-फडणवीस यांच्यासमोर तगडे उमेदवार उभे करणार असल्याचे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले आहे.

मागील काही दिवसांपूर्वीच तिसरी आघाडी ही नेहमी भाजपला मदत करते, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे (Shivse Thackeray Group) नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली होती. यावरुनच प्रहार संघटनेचे नेते, आमदार बच्चू कडू यांनी जोरदार पलटवार केला आहे. संजय राऊत यांच्याकडे पुऱ्या महाराष्ट्राचा पीआर कार्ड नाही, संजय राऊत यांचा अभ्यास कमी आहे. त्यांची जहागीरदार नाही, असा घणाघात करत ‘महाराष्ट्रात तिसरा पर्याय मजबुतीने देऊ’, असे बच्चू कडू यांनी म्हंटले.

तसेच ‘महाशक्तीचा (Parivartan Mahashakti) राज्यात मुख्यमंत्री दिसेल’, असा मोठा दावा बच्चू कडू यांनी केला. आमची महाशक्ती पुऱ्या देशात आदर्श ठरेल, देशभरात आदर्श वाटेल असे राज्य उभे करु असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विरोधात मजबूत उमेदवार देऊ व २८८ जागा पूर्ण लढवू, अशीही घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे.