बहुजननामा ऑनलाइन टीम
बाळांची मसाज केव्हा आणि कशी करावी हे जाणून घ्या…
आयुर्वेदानुसार नवजात शिशुच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी बाळांची मसाज करणे खूप महत्वाचे आहे. बाळांच्या स्नायू व्यायामामुळे बळकट होतात, शरीरात रक्ताभिसरण नियंत्रित राहते. बदलत्या वातावरणामुळे होणाऱ्या आजारापासून दूर ठेवतात. मालिश केल्याने बाळांचा थकवा दूर होतो. त्यांना झोप चांगली मिळते. यामुळे आई आणि मुलाचे नाते अधिक मजबूत होते.
नवजात बाळाच्या मालीशसाठी तेल आणि तूप वापरले जाते. बाळाच्या डोक्यावर मालिश करण्यासाठी तूप वापरणे चांगले आणि शरीरावर मालिश करण्यासाठी तेल. मसाज करण्यासाठी खाण्याचे तेल वापरले जाऊ शकते. याशिवाय मुलांच्या मालिशसाठी बनविलेले विशेष आयुर्वेदिक तेलही वापरता येईल. एक दिवसापासून ते ३ वर्षाच्या वयापर्यंत मालिश करणे गरजेचं आहे. नियमित केले तरीही चालू शकते.
मालिश दरम्यान या गोष्टी लक्षात ठेवा
१) भुकेलेल्या पोटाने बाळाची मालिश करा. नाहीतर मालिश केल्याने शरीरावर परिणाम होऊ शकतो.
२) मालिश दरम्यान आणि एक तासानंतर बाळाला थंड हवेपासून दूर ठेवा.
३) मसाजमध्ये सुगंधित तेल वापरणे टाळा. नारळ, ऑलिव्ह, तीळ तेलासारख्या खाद्य तेलांद्वारे मालिश करता येते. मोहरीच्या तेलानेही मालिश करता येते. परंतु जर त्यामुळं आपल्याला जळजळ होत असेल तर इतर तेल वापरा.
४) नेहमीच डोक्यावर घरच्या तुपानं मालिश करा.
५) ताप, उलट्या, अतिसार आणि बाळाची अस्वस्थता वाटत असल्यास मालिश करू नका.