• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात ते आनंदवन, कोण होत्या डॉ. शीतल आमटे ?

by ajayubhe
November 30, 2020
in ताज्या बातम्या
0

चंद्रपूर : बहुजननामा ऑनलाइन – ज्येष्ठ समाजसेवक स्व. बाबा आमटे (Baba Amte) यांची नात आणि वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी  यांनी सोमवारी (दि. 30) आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. त्यांच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आनंद पेरणाऱ्या आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरले आहे.

डॉ. शीतल आमटे या विकास आणि भारती आमटे यांच्या कन्या होत्या. 2003 मध्ये नागपूरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण घेतले होते. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर शीतल आमटे यांनी कुटुंबीयांचा समाजसेवेचा वारसा जोपासण्यासाठी आनंदवनातच काम करण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे त्या अपंगत्व विशेषज्ज्ञ म्हणूनही प्रसिद्ध होत्या. त्यानंतर त्यांनी महारोगी सेवा समितीची सर्व सूत्रं आपल्या हाती घेतले होते. डॉ. शीतल एक उत्तम फोटोग्राफरसुद्धा होत्या. जानेवारी 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय आर्थिक मंचद्वारे ‘यंग ग्लोबल लीडर 2016’ साठी त्यांची निवड झाली होती. एप्रिल 2016 मध्ये संयुक्त राष्ट्राकडूनही नवोदित राजदूत म्हणूनही शीतल आमटे यांची निवड केली होती.

कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी
मध्यंतरीच्या काळात शीतल आमटे यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ लाईव्ह करून आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या कामाबद्दल आणि संस्थेतील विश्वस्तांबद्दल नाराजी व्यक्त करत गंभीर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली होती. पण, दोन तासांनंतर त्यांचा फेसबुकवरील हा व्हिडिओ डिलीट केला होता. त्यांच्या या व्हिडिओमुळे आमटे कुटुंबातील वादावर चर्चा रंगली होती. परंतु, आमटे कुटुंबाकडून एक पत्रक प्रसिद्ध करून सर्व आरोप फेटाळून लावले होते.

शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या.  मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला. या सर्व वादाच्या केंद्रस्थानी शीतल होत्या, असा आरोप वेळोवेळी झाला. हा अंतर्गत गृहकलह सुरू असतानाच आज त्यांच्या आत्महत्येचे वृत्त आले. विषाचे इंजेक्शन त्यांनी घेतल्याची माहिती समोर येत असून, हे विष घेतल्यावर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, पण शेवटी त्यांची प्राणज्योत मालवली.

Tags: baba aamtebahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJP breaking breaking newschandrapurCongress current newscurrent news latest marathi newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newssucideआत्महत्याचंद्रपूरबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनबाबा आमटेभाजपभीमनामा
Previous Post

DBS Bank मध्ये लक्ष्मीविलास बँकेचे विलिनीकरण झाल्यानंतर ग्राहकांना किती व्याज मिळेल ?, जाणून घ्या

Next Post

War and Peace : आत्महत्या केलेल्या डॉ. शीतल आमटेंचं शेवटचं ट्विट काय होतं, जाणून घ्या

Next Post

War and Peace : आत्महत्या केलेल्या डॉ. शीतल आमटेंचं शेवटचं ट्विट काय होतं, जाणून घ्या

People
विशेष बातम्या

‘लाल’ रंग आवडणाऱ्या व्यक्तींमध्ये असते ‘ही’ विशेष गोष्ट, प्रेमाच्या बाबतीतही असतात इतरांपेक्षा वेगळे !

January 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -  मोजता येणार नाहीत इतके नानाविध रंग जगात आहेत पण आपल्याला या अनेक रंगांपैकी कुठलातरी एक खास...

Read more
Buldhana

बुलढाणा : विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी तिघांना अटक

January 28, 2021
The body

शेवगावात नदीपात्रामध्ये आढळला तरुणाचा मृतदेह, प्रचंड खळबळ

January 28, 2021
Australia

ऑस्ट्रेलियाहून रिसेप्शन देण्यासाठी आला होता तरूण, ट्रॅक्टर मोर्चादरम्यान झाला मृत्यू

January 27, 2021
Shirur

शिरुर : कोऱ्या विड्रॉलवर सह्या घेऊन को-ऑप. सोसायटीनं आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप

January 27, 2021
Tricolor Rally

तिरंगा आमचा सन्मान, पोलीस आमचा अभिमान, भाजपाने केली ‘तिरंगा रॅली’ची घोषणा

January 27, 2021
Coronavirus

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 79 नवीन रुग्ण, 84 जणांना डिस्चार्ज

January 27, 2021
Oppo

Oppo च्या ‘या’ फोनवर 3500 रुपयांचा डिस्काउंट; ‘हे’ 2 फोनही स्वस्त

January 27, 2021
Tragic death

Baramati News : पोहायला गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

January 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

Pune News : ‘कुणाच्या किती बायका, कुणी किती मुलं लपवली, सांगू का ?’ अजित पवारांनी भाजप नेत्यांना खडसावलं

3 days ago

ऑस्ट्रेलिया दौर्‍यात ‘नाव’ कमविणार्‍या मोहम्मद सिराजनं स्वतःलाच दिलं ‘भन्नाट’ गिफ्ट !

5 days ago

Weight Loss : 10000 पावलं चालल्यानं कमी होईल वजन, जाणून घ्या कसा होईल फायदा

22 hours ago

Pune News : पुण्यातील भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या चर्चेवर अजित पवारांचे सूचक वक्तव्य

6 days ago

पिंपरी-चिंचवडमध्ये दृष्टीहीन रीना पाटील बनल्या 1 दिवसाच्या पोलीस आयुक्त !

1 day ago

सिरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग विझवणे आणि हानी टाळणे याला सद्यस्थितीत प्राधान्य : उपमुख्यमंत्री अजित पवार

7 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat