नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्या मंदिर- मशीद विवादात्मक जागेवर अखेर सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. संपूर्ण देशाचं लक्ष वेढलेल्या या निर्णयात विवादात्मक २.७७ एकर जागा ही राम मंदिरासाठी देण्यात आली असून, मशीदीसाठी अयोध्येतच पर्यायी जागा देण्याचे आदेश देण्य़ात आले आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली ५ वकिलांच्या घटनापीठाने हा निर्णय जाहीर केला.
निकालात सकाळपासून घडलेल्या घडामोडी :
९ .५०- संवेदनशील अश्या अयोध्या प्रकरणावर निकाल देणारे पाचही न्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे, डी. वाय. चंद्रचूड, अब्दूल नजीर, अशोक भूषण हे खंडपीठ आज या प्रकरणात निकाल देणार आहेत कोर्टात दाखल’
१०.२० – सरन्यायाधीश रंजन गोगोई कोर्टात
१०.२८ – अयोध्या निकालाच्या निर्णयाची प्रत सुप्रीम कोर्टात पोहोचली. त्यानंतर निकालाला सुरुवात
१०.३८ – शिय्या वफ्फ बोर्डाची याचिका फेटाळण्यात आली. निर्मोही आखाड्याचा दावा ही कोर्टाने फेटाळला.
न्यायालयाने दिलेले निर्णय –
१०.४२ – बाबरी मशीद ही रिकाम्या जागी बनवली नसून याचा अर्थ बाबरी मशीदच्या आधी त्या ठिकाणी मंदिर होतं.
१०.४५ – रामाचा जन्म अयोध्येत झाला याबाबत कोणताही वाद नाही. जमीन विवादाच्या आधारे कायद्यानुसार निर्णय दिला जाईल
Supreme Court orders that Central Govt within 3-4 months formulate scheme for setting up of trust and hand over the disputed site to it for construction of temple at the site and a suitable alternative plot of land measuring 5 acres at Ayodhya will be given to Sunni Wakf Board. pic.twitter.com/VgkYe1oUuN
— ANI (@ANI) November 9, 2019
१०.४९ – एएसआयच्या रिपोर्टनुसार मशीदच्या जागी आधी मंदिर होतं असं देखील निर्णयात म्हटलं गेल्याचं कळतं आहे.
१०. ५२ – १२ व्या आणि १६ व्या शतकात या जागी काय होतं याबाबत कोणताही पुरावा नाही.
१०.५५- आस्था आणि विश्वासच्या आधारावर नाही तर कायद्याच्या आधारावर जमिनीची मालकी दिली जाईल
११.०१ – इंग्रजांच्या काळापर्यंत येथे नमाज वाचली जात होती असा पुरावा नाही.
११.१०- मशीद बनवण्यासाठी ५ एकर जागा देण्याचे आदेश
११.१२ – रामजन्मभूमी न्यासला वाद असलेली जमीन देण्याचे आदेश
११.१५ – राम मंदिर बनवण्यासाठी ट्रस्ट स्थापन करण्याचे कोर्टाचे आदेश
११.२० – राम मंदिर बांधण्यासाठी 3 महिन्यात ट्रस्ट स्थापन करण्याचे आदेश
Chief Justice of India Ranjan Gogoi: We have dismissed the Special Leave Petition(SLP) filed by Shia Waqf Board challenging the order of 1946 Faizabad Court #AyodhyaJudgment pic.twitter.com/hbwibSA3ov
— ANI (@ANI) November 9, 2019
Visit : bahujannama.com