Avinash Bhosale | बिल्डर अविनाश भोसलेंच्या अडचणीत वाढ! मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा देण्यास नकार

Avinash Bhosale builder avinash bhosale case mumbai high court refused to grant him immediate relief

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील बांधकाम व्यावसायिक (Builder) अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना मुंबई हाय कोर्टाने (Bombay High Court) तातडीने दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यांच्या याचिकेवरील पुढील सुनावणी 6 जून पर्यंत तहकूब केली आहे.

अविनाश भोसले (Avinash Bhosale) हे जवळपास एक वर्षापासून कोठडीत आहेत. त्यांना 26 मे रोजी सीबीआयने (CBI) अटक केली होती. येस बँक (Yes Bank) आणि डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी (DHFL Scam) त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. काही अनियमीत कर्ज दिल्याचा आरोप अविनाश भोसले यांच्यावर आहे. ईडीने (ED) मनी लाँड्रींगच्या (Money Laundering) आरोपात देखील तपास सुरू केला होता. तेव्हा पासून अविनाश भोसले कैदेत आहेत.

अविनाश भोसले जामीन मिळवण्यासाठी मागील एक वर्षापासून प्रयत्न करत आहेत. याच प्रकरणी दिलासा मागत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या सुनावणी दरम्यान जून पर्यंत या प्रकरणाची सूनावणी तहकूब केल्याने भोसले यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही.

काय आहे प्रकरण?

– येस बँक आणि डीएचएफएल घोटाळाप्रकरणी ईडी ED), सीबीआयकडून याआधी चौकशी
– 2018 साली एप्रिल ते जून दरम्यान हजारो कोटी रुपये एका खात्यातून दुसऱ्या खात्यात वळते करण्यात आले.
– वाधवान यांना येस बँकेकडून कर्ज मिळवून दिल्याचा आरोप
– सीबीआयच्या मते यात मोठ्या उद्योजकांच्या कंपन्यांचा समावेश होता.
– बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले, चित्रपट निर्माते संजय छाब्रिया (Filmmaker Sanjay Chhabria), बलवा आणि गोएंका यांचा समावेश
– ईडीकडून याआधी अविनाश भोसले यांची 40 कोटींची संपत्ती जप्त

Web Title : Avinash Bhosale builder avinash bhosale case mumbai high court refused to grant him immediate relief