औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – देशातील बहुचर्चित निर्भया प्रकरणात दोषी अक्षय ठाकूरची पत्नी पुनिताने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. पुनिताने हा अर्ज औरंगाबाद कौटुंबिक न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश रामलाल शर्मा यांच्या कोर्टात दिला आहे. अक्षयच्या पत्नीने अर्जात म्हटले आहे कि पतीला बलात्कारात दोषी ठरवले आहे आणि त्यांना फाशी दिली जाणार आहे. ते निर्दोष असून त्यांची विधवा बनून नाही राहायचं. त्यामुळे त्यांना पतीपासून घटस्फोट हवा आहे. माहितीनुसार या प्रकरणात १९ मार्चला सुनावणी करणार असल्याचे निश्चित केले गेली आहे.
अक्षयच्या पत्नीचे अधिवक्ता मुकेश सिंहने सांगितले की, पीडित महिलेला कायदेशीर अधिकार आहे कि हिंदू विवाह कायद्यानुसार १३(२)(II) अंतर्गत काही खास प्रकरणात घटस्फोटाचा अधिकार मिळवू शकते. यात बलात्काराचे प्रकरणही आहे. जर बलात्कारप्रकरणी कोणत्या महिलेचा पती दोषी असेल तर ती घटस्फोटासाठी अर्ज दाखल करू शकते.
सगळ्या दोषींची दया याचिका फेटाळली आहे. निर्भयाच्या चार दोषींनी आपली फाशीची शिक्षा माफ करण्यासाठी राष्ट्रपतींकडे दया याचिका पाठवली होती, जी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळून लावल्या आहेत. दोषी अक्षयने नवीन दया याचिका दाखल केली होती, ज्यात त्याने म्हटले होते कि राष्ट्रपतींनी जी जुनी दया याचिका दाखल केली होती त्यात सगळे पुरावे नव्हते.