नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या २,७७२ भेटवस्तूंचा लिलाव करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रह्लाद पटेल म्हणाले की, गेल्या सहा महिन्यांत पंतप्रधान मोदींना अनेक ठिकाणाहून काही मोमेन्टो व भेटवस्तू मिळाल्या आहेत. त्या लिलावासाठी ठेवण्यात आल्या आहेत. हा लिलाव ३ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. ई-लिलावाबाबत संस्कृती व पर्यटनमंत्री प्रल्हाद पटेल म्हणाले की, १४ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान ई-लिलाव प्रस्तावित आहे. या दिवशी पीएम मोदी यांना मिळालेली भेट लोक खरेदी करू शकतील.
लिलावातील मिळालेली रक्कम नमामि गंगे प्रकल्पासाठी वापरली जाईल. असे सांगितले जात आहे की एकूण २,७७२ वस्तूंपैकी सर्वात जास्त किमती एक पेंटिंग आहे. त्या पैंटिंगची किंमत २.५ लाख आहे. या भेटवस्तूंची किंमत २०० रुपयांपासून सुरु होते आणि सर्वाधिक किंमत २.५ लाख रुपये आहे. यावर्षी जानेवारीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या १८०० हून अधिक भेट लिलावाच्या माध्यमातून विकल्या गेल्या.
असा होईल लिलाव :
या ई-लिलावाविषयी, संस्कृती व पर्यटन मंत्री प्रल्हाद पटेल म्हणाले की, १४ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान ई-लिलावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे आणि पीएम मोदी यांना प्राप्त भेटवस्तू या दिवशी नागरिक खरेदी करू शकतील. मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या मते पंतप्रधान मोदींकडून मिळालेल्या वस्तूंची किमान किंमत २०० रुपये असेल तर सर्वाधिक किंमत अडीच लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.
याआधीही झाला होता लिलाव :
मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी जानेवारी महिन्यात पंतप्रधान मोदींकडून मिळालेल्या १८०० हून अधिक भेट लिलावाच्या माध्यमातून विकल्या गेल्या. पीएम मोदी यांनी जानेवारी २०१९ मध्ये ज्या भेटवस्तूंचा लिलाव केला त्यापैकी एक पेंटिंग आणि लाकडी दुचाकीची प्रत प्रत्येकी पाच लाख रुपयांमध्ये लिलाव करण्यात आली. जानेवारीत झालेला हा लिलाव दोन दिवस चालला. पंतप्रधान मोदींना भेट म्हणून दिलेली भगवान शिवाची एक प्रतिमा १० लाख रुपयांना विकली गेली. त्याची किमान किंमत पाच हजार रुपये ठेवली गेली होती. लिलावाच्या शेवटच्या दिवशी १९०० पैकी २७० वस्तूंचा लिलाव झाला.