Atul Kalsekar On Uddhav Thackeray | ‘उद्धव ठाकरेना महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे’ – अतुल काळसेकर

कणकवली : Atul Kalsekar On Uddhav Thackeray | मुस्लिम आणि ख्रिश्चन कम्युनिटच्या जोरावर उद्धव ठाकरे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना संपवण्याची भाषा करत आहेत. सरळ साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे, असा हल्ला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी चढविला आहे.

उद्धव ठाकरे यांनीच 2019 नंतर देवेंद्र फडणवीस यांना संपवण्याचा प्लॅन केला होता. पण, ते संपले नाहीत, ते मात्र संपलेत. हा खूनशीपणा सर्व महाराष्ट्राने पाहिला आहे.

मुघलांना जसे सगळीकडे संताजी, धनाजी दिसायचे तसेच उद्धव ठाकरे व संजय राऊत यांना देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. देवेंद्र फडणवीस यांना संपवायची भाषा करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना लोकसभेत मिळालेल्या रंडक्या यशाचा आलेला माज आहे. महाराष्ट्राची जनता हा माज नक्की मोडेल.. अश्या धमक्यांना कोणीही घाबरत नाही. ज्या मुस्लिमांच्या मतावर ते राजकारण करत आहात, राज्यातील 90 टक्के हिंदू उघड्या डोळ्यांनी बघत आहेत.

तुम्ही अडीच वर्षात काय केले याचा सगळा हिशोब जनतेकडे आहे. योग्य वेळी जनता धडा शिकवेल.कोकण विभागात प्रत्येक मंडळात उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षात केलेल्या गैरकारभाराचा पर्दाफाश जनतेसमोर करणार असल्याचे अतुल काळसेकर यांनी म्हटले आहे.