नेमकं अशोक चव्हाण यांचा पराभव का विजय ह्या कडे नांदेडकरांचे लक्ष
नांदेड : (माधव मेकेवाड) बहुजननामा ऑनलाईन – Exit poll काही असो विजयाच्या अगोदर तिन्ही मुख्य उमेदवाराची जयत तयारी?नांदेड मध्ये equal मत पडणार असा सर्व स्थानिक कार्यकर्ते कडून जरी अंदाज मिळाला असला तरी विजयाचा खरा शिल्पकार कोण असणार ह्यासाठी सर्वांचे लक्ष वेधून आहे.
सतराव्या लोकसभेसाठी घेण्यात आलेल्या सात टप्यातील प्रदीर्घ निवडणुकीचे निकाल २३ मे २०१९ रोजी लागत आहेत.तो पर्यंत सर्वांनीच संयम बाळगायला पाहिजे .नांदेड जिल्ह्यात वारे अशोक चव्हाण यांच्या बाजूने वाहील असे चित्र दिसत असलेले सोसिल मीडिया वर दिसत असले तरी काही ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारास मत तेवढे पडणार नसल्याची exit poll मधून वृत्तवाहिनीने बातमी प्रसारित केली आहे ,ह्या नांदेड जिल्ह्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा भाजपा उमेदवारीला भरगोस मतांनी विजयी करा म्हणून ऐतिहासिक सभा झाली.त्यानंतर याच मतदार संघात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या तीन सभा झाल्या.देशात मोदी लाट कायम अजूनही टिकून आहे तरी प्रताप पा चिखलीकर यांना लोकसभेची संधी मिळेल का?नेमकं नांदेड जिल्ह्यात कोण खासदार होईल नक्की सांगता येत नाही.
वंचित बहुजन आघाडी देखील खासदार म्हणून प्रा.यशपाल भिंगे निवडून येतील असे हट्ट जोरधरूर आहे त्या मुळे अशोक चव्हाण यांचा अशोक पर्व नष्ट होणार का अशी चर्चा सध्या जोर धरून आहे.भोकर येथील सभेत अशोक चव्हाण यांनी मतदारांना सांगितले की वड्याच तेल वांग्यावर टाकू नका,माझ्या पक्षातील कुठल्या कार्यकर्त्यांनी चुका केल्या असतील तर त्यांची सज्जा मला देऊ नका निवडणूक झाल्या नंतर मी त्यांच्याबद्दल विचार नक्की करेन असे उदगार अशोक चव्हाण यांनी सभे वेळी काढले होते त्या मुळे जर अशोक चव्हाण यांची लोकसभेत हार झाली तर अशोक चव्हाण यांच्या कडून चांगली परीक्षा घेतील का? अशी चर्चा नांदेड लोकसभेत सुरू आहे.
तरी ह्या मोदी लाटेत अशोक चव्हाण यांचा विजय निश्चित का?काही वृत्त वाहिन्यांच्या बातमी पत्रात exit poll वर अशोक चव्हाण यांचा दारुण पराभव तर काही वृत्त वाहिन्यांच्या exit poll वर अशोक चव्हाण विजयाचे शिल्पकार.सदरील सर्व उमेदवाराचे भविष्य २३ मे पर्यंत बंद असलेल्या EVM मशीन मध्ये आहे विजय कुणाचा झाला हे २३ मे रोजी कळणार आहे ह्या निकालाडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.