बहुजननामा ऑनलाइन टीम – राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) विक्रोळी युनिटने गेल्या वर्षी अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी(drug smuggling empire) १३ जणांना अटक केली आहे. त्यानंतर आता ड्रग्ज तस्करीतून पैशांतून उभारलेल्या कोट्यवधीच्या साम्राज्यावर एटीएसने ‘साफेमा’अंतर्गत कारवाई करत टाच आणली असून, १३ जणांची बँक खातीही गोठवली आहे. अटक करण्यात आलेल्यामध्ये दाऊद गँगच्या हस्तकाचाही समावेश आहे.
अब्दुल रज्जाक कादर शेख, इरफान बादर शेख, सुलेमान जोहर शेख, जितेंद्र शरद परमार ऊर्फ आसिफ, नरेश मदन म्हसकर, सरदार उत्तम पाटील, जुबेर मोमिन, मोहम्मद सलीम अब्दुल हमीद मेमन, कैस सिद्दिकी, आवेश खान, मोहम्मद अझीस परयानी, मोहम्मद वसीम अब्दुल लतीफ शेख, मुस्तफा चारानिया ऊर्फ गुड्डू अशा तब्बल १३ तस्करांना एटीएसने अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध दोषारोप पत्रही दाखल केले. या कारवाईत १४६ किलो १४३ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. त्याची किंमत ५८ कोटी ५५ लाख ७२ हजार इतकी आहे.
आरोपींनी विक्रीतून मिळालेल्या पैशातून अनेक ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्या. त्यामध्ये वाहने, बंगले, गाळा आणि दागिने खरेदी केले. त्यांच्याकडून १ कोटी ५५ लाख १९ हजार २९० रुपयांची रोकडही हस्तगत करण्यात आली आहे. तसेच ३ वाहनेही जप्त केली आहेत. यातील पाटील याने सांगलीत एमआयडीसी येथे ३ हजार १९५ चौरस मीटरचा गाळा खरेदी केला असून, कैसने २०१९ मध्ये रायगडमध्ये फ्लॅट आणि गाळा खरेदी केला. याची एकूण किंमत ८० लाख ७५ हजार रुपये इतकी आहे.
‘साफेमा’अंतर्गत कारवाई
दाऊद गँगचा हस्तक असलेला आरोपी परयानीकडून ४१ लाख ४२ हजार किमतीचे दागिने, ३ लाख २० हजार किमतीची विदेशी बनावटीची घड्याळे तसेच अमेरिकन डॉलर जप्त केले. स्मगलिंग अँड फॉरेन एक्सचेंज मॅनीपुलेटर्स अथाॅरिटीअंतर्गत (साफेमा) सर्व मालमत्ता गोठविण्यात आली आहे. साफेमा हा एक सरकारी विभाग आहे, जो अर्थ मंत्रालयाच्या अख्यत्यारीत येतो.