बहुजननामा ऑनलाईन
हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरण ताजे असतानाच गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यात धक्कादायक बलात्काराची घटना समोर आली आहे. एकानं 3 अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. धक्कादायक बाब अशी की, शाळकरी मुलींना चॉकलेटचं आमिष दाखवून हा नराधम चिमुकल्या मुलींवर अत्याचार करत होता. वडोदरा जिल्ह्यातील मकापुरा येथील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
डीसीपी लखधीरसिंग झाला यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, “शाळेतील मुलीनं प्रथम आपल्या शिक्षकांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. यानंतर ही घटना उघडकीस आली. गुड टच आणि बॅड टच चे धडे शिकवताना शिक्षकाकडून असं काही झाल्याचं तिनं सांगितलं आहे. यानंतर शिक्षकांनी पीडित मुलीच्या पालकांना बोलवलं आणि नराधमाच्या कृत्याचा पर्दाफाश केला.
https://twitter.com/ANI/
या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली. यानंतर त्यानं गुन्ह्याची कबुली दिली. इतकंच नाही तर आणखी 2 मुलींवर बलात्कार केल्याचंही सांगितलं. चॉकलेटचे आमिष दाखवून 3 मुलींवर अत्याचार केल्याचं आरोपीनं मान्य केलं. पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करत आरोपीला अटक केली आहे.