नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ATM Withdrawal Charges Rules | नवीन वर्षाच्या सुरवाती बरोबर देशात एटीएममधून पैसे काढणे (ATM Withdrawal Charges Rules), बँक लॉकर (Bank Locker) आणि EPF कॉन्ट्रीब्यूशनशी संबंधित नियमांमध्ये केलेले बदल देखील लागू करण्यात आले आहेत. फ्री ट्रांसजेक्शन (Free Transaction) केल्यानंतर एटीएममधून पैसे काढण्याचे चार्ज वाढवण्यात आले आहे. बँक लॉकर बाबत बँकांची जबाबदारीही वाढवण्यात आली. यासोबतच ईपीएफ योगदानासाठी खातेदारांचे आधार कार्ड (Aadhaar Card) अनिवार्य करण्यात आले आहे. (ATM Withdrawal Charges Rules)
ATM Withdrawal charge
RBI ने 10 जून 2021 रोजी एक जाहीर घोषणा केली होती, त्यानुसार, 1 जानेवारी 2022 पासून, बँकांना मासिक मोफत एटीएममधून पैसे काढण्याच्या मर्यादेपलीकडे प्रत्येक व्यवहारासाठी 20 रुपयांऐवजी 21 रुपये आकारण्याची परवानगी देण्यात आली होते. तसेच आजपासून (ATM Withdrawal Charges Rules) त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. तथापि, ग्राहक त्याच्या स्वत:च्या बँकेच्या एटीएममधून 5 वेळा मोफत पैसे काढण्याची मर्यादा आणि इतर बँकेच्या एटीएममधून 3 वेळा मोफत पैसे काढण्याच्या मर्यादेचा लाभ घेत राहतील.
Bank Locker Rules
बँक लॉकर्सबाबत बँकांची जबाबदारी वाढली आहे. RBI च्या 18 ऑगस्ट 2021 च्या अधिसूचनेनुसार, 1 जानेवारी 2022 पासून, बॅंका त्यांच्या कर्मचार्यांनी लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंच्या नुकसानीची जबाबदारी चोरी किंवा फसवणुकीमुळे टाळू शकत नाहीत. भारताच्या मध्यवर्ती बँकेने अशा नुकसानासाठी बँकेचे दायित्व चालू वार्षिक बँक लॉकर भाड्याच्या 100 पटीने ठेवले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
EPF Contribution
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खातेधारकांनी 31 डिसेंबर 2021 पर्यंत त्यांचा आधार क्रमांक आणि EPF खाते लिंक करणे अनिवार्य होते. तसे न झाल्यास कंपनीचे पीएफ खात्यातील योगदान बंद केले जाईल. अशा परिस्थितीत, ज्यांनी त्यांचे आधार कार्ड आणि पीएफ खाते लिंक केलेले नाही, कंपनीने या महिन्यासाठी केलेले पीएफ योगदान त्यांच्या खात्यात येणार नाही.
Web Title :- atm withdrawal charges rules changes bank locker epf contribution new rules
Restrictions in Pune | कोरोना आणि ओमायक्रॉन विषाणूला अटकाव घालण्यासाठी पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध