नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्हाला एटीएम मशिनमधून पैसे काढायचे असल्यास त्यासाठी एटीएम कार्ड आवश्यक आहे. त्याशिवाय पैसे काढता येऊ शकत नाहीत. मात्र, आता तुम्हाला एटीएम कार्डशिवायही पैसे काढता येऊ शकतील. होय, आता ते शक्य होऊ शकेल.
एटीएम बनवणाऱ्या एनसीआर कार्पोरेशनने UPI प्लॅटफॉर्मवर आधारित पहिला इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विड्रॉव्हल (ICCW) सोल्यूशन लाँच केला आहे. या माध्यमातून UPI अॅपच्या माध्यमातून QR कोड स्कॅन करून एटीएममधून पैसे काढता येऊ शकतील. त्यासाठी सिटी युनियन बँकेने एनसीआर कॉर्पोरेशनसोबत हातमिळवणी केली आहे.
ही प्रोसेस करा फॉलो…
– सर्वात पहिले तुम्हाला UPI अॅप्लिकेशन (BHIM, Paytm, Phonepe, Amazon) उघडावे लागले.
– त्यानंतर ATM स्क्रीनवर दिलेला QR Code स्कॅन करा.
– ही रक्कम फोनवर टाका. सध्या जास्तीत जास्त 5 हजार रुपये काढता येऊ शकतील.
– Proceed च्या बटणावर क्लिक करून कन्फर्म करा.
– त्यानंतर तुम्ही 4 किंवा 6 अंकी UPI पिन टाका
– त्यानंतर तुम्हाला एटीएम मशिनमधून पैसे काढता येतील.