नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Atal Pension Yojana | जर तुम्हाला सुद्धा निवृत्तीनंतर पेन्शन पाहिजे असेल तर या सरकारी योजनेत पैसे जमा करून तुम्ही दरमहिना एक चांगली रक्कम मिळवू शकता. या योजनेंतर्गत पती-पत्नी दोघांना लाभ मिळू शकतो.
(Atal Pension Yojana) यासाठी सरकारी नोकरीची आवश्यकता नाही. या अंतर्गत नोकरी न करणारे सुद्धा पेन्शन मिळवू शकतात. या सरकारी योजनेत दर महिना 210 रुपयांचे योगदान द्यावे लागेल आणि जेव्हा या योजनेंतर्गत पेन्शनची वेळ येईल तेव्हा तुमच्या खात्यात रोजचा खर्च भागवण्याइतके पैसे येतील.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काय आहे ही सरकारी योजना?
केंद्र सरकारच्या अटल पेन्शन योजनेत (Atal Pension Yojana) गुंतवणूक करून लोक 60 वयानंतर वृद्धत्वात पेन्शनचा लाभ घेऊ शकतात. यात पती-पत्नी दोघांनी गुंतवणूक केली तर 60 वर्षानंतर दोघांनी मिळून 10,000 रुपये महिन्याची पेन्शन मिळते. योजनेत सहभागी होण्यासाठी किमान वय 18 वर्ष आणि कमाल 40 वर्ष असावे. कोणत्याही बँकेत किंवा पोस्टात खाते उघडून याचा लाभ घेता येऊ शकतो.
अटल पेन्शन योजनेचा लाभ
अटल पेन्शन योजनेत (Atal Pension Yojana) गुंतवणूक करून लोक 60 वयानंतर वृद्धत्वात 1000-5000 रुपये पेन्शनचा लाभ घेऊ शकतात. आयकर कायदा, कलम 80 सीसीडी (1बी) अंतर्गत या योजनेत करात सवलत मिळते.
पती-पत्नीला मिळेल 10,000 रुपये पेन्शन
योजनेत सहभागी होण्यासाठी किमान वय 18 वर्ष आणि कमाल 40 वर्ष असावे.
या योजनेत सहभागी होणार्यांना वयाच्या 60 वर्षानंतर 5000 रुपये महिना पेन्शन मिळेल.
जर योजनेचा लाभ घेणार्या व्यक्तीचे वय 18 वर्ष आहे तर त्यास 210 रुपये महिना गुंतवणूक करावी लागेल.
39 वर्षापेक्षा कमी वयाचे पती-पत्नी वेगवेगळे या योजनेत 420 रूपये जमा करून 60 वर्षाच्या वयानंतर दरमहिना 10,000 रूपये पेन्शन घेऊ शकतात.
Web Title :- Atal Pension Yojana | in atal pension government scheme deposit rs 210 every month both husband and wife will get a pension of 10000
घाईगडबडीत कधीही रिडिम करू नका Mutual Fund, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; अन्यथा होऊ शकते पैशाचे नुकसान !
Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार
Pune Crime | पुणे अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून ‘पॉपी स्ट्रॉ’ ड्रग्ससह तिघांना अटक