नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलियाच्या फ्लिंडर्स यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी एका रिसर्चबाबत सांगितले की, एका विशिष्ट वयात महिलांच्या शारीराची संबंध ठेवण्याची इच्छा नष्ट होते आणि महिला आपल्या पार्टनरसोबत संबंध ठेवू शकत नाहीत. हे वय कोणते, ज्या वयानंतर महिलांमध्ये शारीरीक संबंध ठेवण्याची इच्छा नष्ट होते, ते सविस्तर जाणून घेवूयात. ऑस्ट्रेलियाच्या फ्लिंडर्स यूनिव्हर्सिटीमधील संशोधकांनी संशोधनात 1300 महिलांचा अभ्यास केला आणि सांगितले की, 45 वर्षांच्या वयानंतर महिलांच्या शरीराची पुरूषाशी संबंध ठेवण्याची इच्छा नष्ट होते आणि महिला या काळात संबंध एन्जॉय करू शकत नाहीत.
त्यांच्या शरीरात हे यामुळे होते की, या वयानंतर महिलांची मासिक पाळी बंद होते. कारण त्यांच्या शरीरात प्रोजेस्टेरोन हार्मोनची निर्मिती होत नाही. यामुळे महिलांच्या शरीरात संबंध ठेवण्याची इच्छा जागृत होत नाही. फ्लिंडर्स यूनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ जेसन जॉन यांनी सांगितले की, 35 व्या वयातच महिलांच्या शरीरात प्रोजेस्टेरोन हार्मोन कमी होऊ लागते. यामुळे नंतर त्यांच्या शरीराची संबंध ठेवण्याची इच्छा हळूहळू कमी होऊ लागते. परंतु, महिलांच्या शरीरात होणार्या समस्या त्यांचे आरोग्य आणि शरीराची रचना यावर खुप काही अवलंबून असते.
जर महिला शारीरीकदृष्ट्या फिट आणि निरोगी असेल तर तिच्या शरीरात संबंध ठेवण्याची इच्छा 45 से 50 वर्षांपर्यंत राहू शकते. परंतु, अशा महिलांची संख्या खुपच कमी आहे. संशोधनादरम्यान संशोधकांनी 1300 महिलांवर संशोधन केले आणि महिलांच्या शरीरात होणारे हार्मोन्सचे बदल आणि त्यांच्या पीरियड्सवर अभ्यास केला, ज्यामधून हे समजले की वयाच्या 45 व्या वर्षानंतर महिलांमध्ये संबंध ठेवण्याची इच्छा नष्ट होते. तसेच या वयानंतर महिला गर्भधारणाही करू शकत नाहीत, कारण पीरियड बंद झाल्यानंतर गर्भाशयात बीजांड तयार होत नाहीत.
Visit : bahujannama.com