नवी दिल्ली : वृत्तसंस्था- आयआरसीटीसीने ग्राहकांच्या सुविधेसाठी आपल्या वेबसाइटवर आर्टिफिशियल इन्टेलिजन्सयुक्त चॅटबोट फीचर Ask Disha सादर केले आहे. आयआरसीटीसीकडून ऑनलाइन तिकिट बुक करणार्यांसाठी हे अतिशय उपयुक्त फीचर आहे. आयआरसीटीसीने ट्विट करून सांगितले आहे की, हे ग्राहकांना मदत करण्यासाठी 24 तास उपलब्ध करून देण्यात आले आहे. आर्टिफिशियल इन्टेलिजन्सयुक्त या फीचरद्वारे युजर आपल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर काही क्षणात मिळवू शकतात.आस्क दिशा फीचर लोकांना तिकिट बुकिंग, तिकिट कॅन्सलेशन, तत्काल तिकिट बुकिंग आणि दूसर्या गोष्टींबाबत पूर्ण माहिती देईल. आस्क दिशा डिजिटल इन्टरॅक्शनचे माध्यम आहे, जे कोणत्याही वेळी युजरची मदत करते.
To provide better customer support to #IRCTC website users, an AI-driven #chatbot feature 'Ask Disha' that answers all #booking/ #ticketing related queries has been initiated. For more details, visit: https://t.co/e14vjdPrzt #NayaDashakNayiDisha #IRCTCOfficial
— IRCTC (@IRCTCofficial) January 27, 2020
आयआरसीटीसीच्या माहितीनुसार, आस्क दिशाचा वापर करण्यासाठी भारतीय रेल्वे प्रवाशी चॅट बोटद्वारे आपला कोणताही प्रश्न विचारू शकतात. आयआरसीटीसीची वेबसाइटवरील आस्क दिशावर क्लिक करून रेल्वे प्रवासी आपला प्रश्न टाईप करतील, आणि त्यासमोर लगेचच उत्तर मिळेल. आस्क दिशाला तुम्ही विचारू शकता की, तत्काल तिकिट बुकिंगसाठी कोणते कनेक्शन उपलब्ध आहे. याशिवाय, तुम्ही दुसरे प्रश्नही विचारू शकता. हे चॅटींगप्रमाणेच आहे.
कसे काम करते आस्क दिशा
उदाहरणार्थ जर तुम्ही आस्क दिशाच्या चॅट बॉक्समध्ये विचारले की, ई-तिकिट कसे कॅन्सल करायचे, आणि रिन्फड कसा मिळवायचा ? यावर आस्क दिशा तुम्हाला पूर्ण पद्धत लिखित रूपात समजावून सांगेल. यूजर्स आपल्या सोयीनुसार इंग्रजी अथवा हिंदीमध्ये प्रश्न विचारू शकतात.
Visit : bahujannama.com