बहुजननामा ऑनलाइन – राज्यातील सर्वात मोठ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर बीड जिल्ह्याचे अशोक डक यांची सभापती पदी निवड झाली आहे. मराठवाड्यातून माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या नंतर अशोक डक यांची वर्णी लागली आहे त्यांच्या रूपाने मराठवाड्याला संधी लाभली आहे. महा विकास आघाडीतील राजकीय नेतेमंडळी व पक्ष पदाधिकारी यांच्याकडून सभापती अशोक डक यांचा सत्कार होत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी अशोक डक यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार परभणी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा तथा जि.प. सदस्य भावनाताई नखाते यांनी केला. याप्रसंगी नंदाताई डक, अमृताताई डक, मीराताई सरोदे यांची उपस्थिती होती. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर महा विकास आघाडीने बाजी मारली आहे. मराठवाड्यातून अशोक डक यांची तर पश्चिम महाराष्ट्रातून धनंजय वाडकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. सभापती अशोक डक हे पवारांचे निकटवर्तीय मानले जातात.