मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Ashish Shelar | राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. तेव्हापासून आघाडी सरकारमध्ये काही ना काही कुजबूज सुरू असते. नाराजी दिसून येते. विशेष तर काॅग्रेसमधील (Congress) अंतर्गत वाद देखील दिसला. वांद्रयातील काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी (Zishan siddiqui) यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्याबाबत वरिष्ठाकडे तक्रार केलीय. अशातच आता भाजपमध्ये (BJP) देखील अंतर्गत मतभेद समोर आले आहे. यावरुन भाजपामध्येही अंतर्गत वाद (Ashish Shelar) आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातच मुंबई महापालिकेसाठी तर पक्षांनी कंबर कसली आहे.
आज (सोमवारी) वांद्रे येथील मुंबई भाजपच्या (BJP) आंदोलनाच्यावेळी हे प्रकर्षाने समोर दिसून आलं आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांची नाराजी दिसून आली आहे.
शेलार यांनी आंदोलनातून मधूनच बाहेर गेले असल्याचे सांगण्यात येत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, आशिष शेलार (MLA Ashish Shelar) हे व्यासपीठावर फक्त 5 मिनिटे उपस्थित राहून कार्यकर्त्यांना संबोधित न करताच ते निघून गेले आहेत.
तसेच मिडियांशी देखील बोलले नाहीत. नांदेड, अमरावती, मालेगाव दंगलीच्या निषेधार्थ वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु आहे.
मागच्या महापालिका निवडणुकीची जबाबदारी आशिष शेलार यांच्याकडे होती.
त्यानंतर आता तीच जबाबदारी अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांच्याकडे आहे.
यामुळे आशिष शेलार नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.
Web Title : Ashish Shelar | bjp internal dispute mla leader ashish shelar leaves stage mumbai marathi news bahujannama.
Farm Laws | ‘या’ कारणामुळे PM मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेतले, नेमकं अन् खरं नेमके कारण आलं समोर
Kirit Somaiya | किरीट सोमय्यांच्या दिल्लीवारीने महाविकास आघाडीतील नेत्यांच्या अडचणी वाढणार?
Amravati Violence | वादग्रस्त वक्तव्य करुन काड्या करु नये, संजय राऊतांनी साधला फडणवीसांवर ‘निशाणा’