मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Ashish Shelar | वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta-Foxconn Project) महाराष्ट्रात तुम्ही आणलाच नाही आणि गेला म्हणून ओरडता? अडीच वर्षे कंपनीला का लटकवले? टक्केवारीसाठी वाटाघाटी सुरू होत्या का? खोटे बोलून मराठी तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करणार्या आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी करत मुंबईतील भाजपाचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेला (Shivsena) कारवाईचा इशारा दिला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी यासंदर्भात एक ट्विट केले असून त्यात म्हटले आहे की, ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) अडीच वर्षांच्या काळात वेदांत-फॉक्सकॉन कंपनीला ना जमीन दिली ना, कुठला करार केला… हा घ्या सरकारी पुरावा. प्रकल्प महाराष्ट्रात तुम्ही आणलाच नाही आणि गेला म्हणून ओरडता? अडीच वर्षे कंपनीला का लटकवले? टक्केवारीसाठी वाटाघाटी सुरू होत्या का? चौकशी झालीच पाहिजे!
या ट्विटमध्ये शेलार यांनी पुढे म्हटले आहे की, या प्रकरणी खोटे बोलून मराठी तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करणार्या आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी! चौकशीला सामोरे जा… अजून बरेच निघेल! अन्यथा तरुणांची माथी भडकवणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे या प्रकरणी कायदेशीर कारवाई सरकारने का करू नये?
यापूर्वी शेलार यांनी आमची रोखठोक सच्चाई असे म्हणत शिवसेनेला उद्देशून खुले पत्र लिहिले होते. यात बोचरी टीका करताना शेलार यांनी म्हटले होते की, पेंग्विन सेनेच्या हाती धुपाटणे यायची वेळ आली… आयना का बायना… घेतल्याशिवाय जायना असे वागणार्यांकडून सगळ्या टक्केवारीचा हिशेब मुंबईकरच मागत आहेत… हसीना पारकर सोबत देवाणघेवाण, कसाबला बिर्याणी, याकूबच्या कबरीवर रोषणाई करणारे आता म्हणे, भाजपाचा कोथळा काढणार? वा रे वा!
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Ashish Shelar | bjp ashish shelar slams shivsena aaditya thackeray over vedanta foxconn project
हे देखील वाचा :
Pear Health Benefits | डाएटमध्ये सहभागी केले नाशपती तर चांगल्या आरोग्यासह मिळेल तजेलदार त्वचा!