नवी दिल्ली वृत्तसंस्था – भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांच्या शौचालय साफ करण्याच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर चांगलीच टीका होत आहे. साध्वीच्या वक्तव्यावर एमआयएमचे अध्यक्ष असदूद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे. साध्वी प्रज्ञासिंह या पीएम नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाला आव्हान निर्माण करत आहेत. प्रज्ञासिंह या देशातील जायीय भेदभावाला सुरु ठेवू इच्छितात असं ते म्हणाले.
Asaduddin Owaisi: She (Pragya Thakur, BJP MP from Bhopal) also clearly tells that the kind of work the caste has defined, that should continue. It is very unfortunate. Also, she has openly opposed the PM’s program. 2/2 https://t.co/fUZIWUZX61
— ANI (@ANI) July 22, 2019
ओवेसी म्हणाले की, मला त्यांच्या वक्तव्याचं जराही आश्चर्य वाटलं नाही. मी त्यांच्या वक्तव्यामुळे व्यथित झालो आहे. त्यांनी असं वक्तव्य केलं कारण ते त्यांचे विचार आहेत. खासदार साध्वी भारतात होणाऱ्या जाती आणि वर्ग व्यवस्थेतील भेदभाव मानतात. ते पुढे म्हणाले की, त्या स्पष्टपणे सांगत आहेत की जातीव्यवस्थेनुसार जातींनी जे काम करायचे आहे. ते पुढे सुरु राहिले पाहिजे. ही बाब दुर्दैवी आहे. त्यासोबतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाला स्पष्टपणे विरोध केला आहे.
Asaduddin Owaisi on BJP MP Pragya Thakur’s remark ‘not elected to clean toilets’: Not at all surprised, neither I’m shocked by this obnoxious statement; she says this because that is her thought process. The MP believes in the caste & class discrimination happening in India.1/2 pic.twitter.com/A1l0DbywDq
— ANI (@ANI) July 22, 2019
काय म्हणाल्या साध्वी ?
साध्वी प्रज्ञासिंह यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात त्या म्हणाल्या की, जनतेच्या नाल्या आणि शौचालय साफ करण्यासाठी त्या खासदार झाल्या नाहीत. मी ज्या कामासाठी खासदार बनले आहे. ते काम मी इमानदारीने करत आहे.
#WATCH BJP MP from Bhopal, Pragya Thakur in Sehore: Hum naali saaf karwane ke liye nahi bane hain. Hum aapka shauchalaya saaf karne ke liye bilkul nahi banaye gaye hain. Hum jis kaam ke liye banaye gaye hain, vo kaam hum imaandaari se karenge. #MadhyaPradesh pic.twitter.com/VT4pcGKkYx
— ANI (@ANI) July 21, 2019