बहुजननामा ऑनलाईन टीम – देशभरात कोरोनामुळे सर्वसामान्य जनतेपासून अनेकांना त्रास सहन करावा लागला आहे. त्यामध्ये कोरोना योद्ध्यांसह आजीमाजी मंत्री देखील विळख्यात सापडत आहेत. दरम्यान, फिटनेसमुळे नुकतेच चर्चेत आलेले अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांची स्वतः ट्वटिद्वारे माहिती दिली आहे.
मी कोरोना तपासणीसाठी आरटी-पीसीआर टेस्ट करून घेतल्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी लक्षणंविरहीत व तंदुरुस्त आहे. एसओपीनुसार आणि इतरांच्या सुरक्षेसाठी, मी स्वतःचे विलगीकरण करून घेतले आहे. जे माझ्या संपर्कात आले आहेत, त्या सर्वांनी एसओपीचे पालन करावे. असे आवाहन त्यांनी ट्विटद्वारे केले आहे. त्यांनी फेसबुक आणि ट्विटवरुन काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यामध्ये खांडू हे डोंगर दर्यांमधून, नद्यांच्या काठांवरुन ट्रेकिंग करताना दिसत आहेत.
यावरुनच त्यांच्या फिटनेससंदर्भात चर्चा देखील सुरु झाल्या होत्या, शिवाय त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव देखील केला जात होता. नुकताच त्यांनी एक 24 किलोमीटरचा ट्रेक पूर्ण केला होता. 11 तासांचा ट्रेक करुन खांडू हे त्यांच्या मोजक्या सहकार्यांसहीत लुगुथांग या दूर्गम भागातील गावामध्ये गेले होते. तावांग जिल्ह्यामधील लुगुथांग या गावात जाऊन खांडू यांनी गावकर्यांची भेट घेतली.