नवी दिल्ली वृत्तसंस्था : भाजप नेते तसेच विख्यात कायदेतज्ज्ञ, माजी अर्थ आणि संरक्षण मंत्री अरुण जेटली यांचे वयाच्या ६६ वर्षी निधन झाले. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांचे नाव अरुण जेटली यांनीच सुचवेल होते. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतरही जेटलीं सरकारच्या प्रत्येक धोरणामागे खंबीरपणे उभे होते.
अर्थमंत्रीपदी कार्यभार सांभाळताना त्यांनी आपल्या जीवाचे रान केले. अनेक महत्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतले. मात्र २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा सामोरे जातेवेळी जेटली यांची तब्येत खालावली, त्यामुळे त्यांना या निवडणूक प्रक्रियेत सामील होता आले नाही. नुकतेच निधन झालेल्या सुषमा स्वराज यांना देखील अश्याच परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे जेटली यांना श्रद्धांजली वाहिली आहे.