नवी दिल्ली वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरशी संबंधित कलम ३७० हटविल्यानंतर सुरक्षेची खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणावर जम्मू काश्मीरमध्ये सैन्य तैनात करण्यात आले आहे. त्यातच आता जम्मू काश्मीरमधील कारागृहात असलेले ७० दहशतवादी आणि पाक समर्थन करण्यारे फुटीरतावादी यांना हवाई दलाच्या विशेष विमानाने आग्रा येथील कारागृहात हलविण्यात आले आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
Srinagar- Around 70 terrorists and hardcore pro-Pakistan separatists from Kashmir valley have been shifted to Agra. The terrorists and separatists were shifted in a special plane provided by the Indian Air Force: Sources pic.twitter.com/6DsDYNrddh
— ANI (@ANI) August 8, 2019
जम्मू काश्मीरशी संबंधित कलम ३७० हटविण्यात आल्यानंतर राज्यात सर्वत्र सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. अनेक भागांमध्ये कलम १४४ नुसार संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर सुरक्षेचा उपाय म्हणून राज्यातील जवळपास ४०० राजकिय नेते, आणि इतर नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि उमर अब्दूल्ला यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालदेखील तेथे हजर आहेत.त्यानंतर आता सुरक्षेचा उपाय म्हणून जम्मू काश्मीरमधील ७० दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांना आग्र्यातील कारागृहात हवाई दलाच्या विशेष विमानाने शिफ्ट करण्यात आले आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली.