नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लस उत्पादनासाठी (Vaccine Production) रशियाने भारताचे कौतुक केले आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरिल दिमित्रीव म्हणाले की, पूर्ण जगातील लसींपैकी एकट्या भारतात 60% उत्पादन केले जाते. आम्ही आमची लस स्पुतनिक व्ही साठी भारताच्या संबंधित मंत्रालयांच्या संपर्कात आहोत.
‘आम्ही भारताच्या क्षमतांना स्वीकार करतो’
ते म्हणाले आहेत की आम्ही लस उत्पादनामध्ये पाठिंब्यासाठी भारताच्या क्षमतांना समजतो. भारत ही लस केवळ आपल्या देशासाठीच नव्हे तर इतर देशांसाठीही तयार करु शकतो. आम्ही भारतातील काही कंपन्यांसोबत निश्चित करारापर्यंत पोहोचलो आहोत.
Around 60% of all vaccines in the world are being produced in India. We are having close dialogue with corresponding ministries & Indian govt & its leading manufactures regarding localisation of production of Sputnik V vaccine: Kirill Dmitriev, CEO, Russian Direct Investment Fund
— ANI (@ANI) September 4, 2020
We do recognise India's potential to become a support for the production of the vaccine not only in Indian markets but for other countries too & we have achieved certain agreements with the leading companies: Kirill Dmitriev, CEO, Russian Direct Investment Fund
— ANI (@ANI) September 4, 2020
रशियाने जगातील पहिल्या कोरोना लसीची घोषणा केली, झाली टीका विशेष म्हणजे रशियाने 10 ऑगस्ट रोजी कोरोना लसीची घोषणा केली होती. जगभरात लसींच्या शोधादरम्यान रशियाच्या घोषणेविषयी तज्ज्ञांनी चिंता देखील व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही रशियन लसीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. तज्ञ म्हणतात की रशियाने या लसीसाठी पुरेशा चाचण्या केल्या नाहीत आणि अशी घाई धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते. अध्यक्ष पुतीन म्हणाले होते की, त्यांच्या मुलीनेही या लसीचा डोस घेतला आहे.