नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) Arogya Rakshak नावाचा हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन लाँच केला आहे. या विमा योजनेची सुरुवात आजपासून झाली आहे. हा प्लान नॉन लिंक्ड, नॉन पार्टीसिपेटिंग, रेग्युलर प्रीमियम पर्सनल इंश्युरन्स प्लान आहे. या प्लानचे वैशिष्ट्य हे आहे की जर कोणताही धोकादायक आजार झाला तर त्यावर हा निश्चित लाभ देतो. सोबतच इमर्जन्सीत पैशांची गरज पडल्यास त्या कठिण काळात कुटुंबियांना यातून आर्थिक मदत सुद्धा मिळते. कुणीही व्यक्ती या प्लान अंतर्गत स्वताचा किंवा कुटुंबात पत्नी, मुले, आई-वडीलांचा विमा (arogya rakshak health insurance plan) काढू शकतो.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
प्लानची वैशिष्टय
या योजनेंतर्गत मुख्य विमित व्यक्तीचे वय 18 वर्ष ते 65 वर्ष वय आणि मुलांचे वय 91 दिवसापासून 20 वर्ष वयासाठी उपलब्ध आहे. गार्डियनसाठी याचे कव्हर पीरियड 80 वर्षाच्या वयापर्यंत आणि मुलांसाठी 25 वर्षापर्यंतसाठी आहे.
पॉलिसी अंतर्गत मिळतात हे फायदे
* पॉलिसी निवडण्यासाठी फ्लेक्सिबल लिमिट
* सोप्या आणि सुविधाजनक प्रीमियम पेमेंटचा पर्याय
* हॉस्पिटलमध्ये भरती होणे किंवा सर्जरी इत्यादी प्रकरणात व्हॅल्युएबल फायनान्शियल प्रोटेक्शन
* वास्तविक वैद्यकीय खर्चावर लक्ष दिल्याशिवाय एकरकमी लाभ
* ऑटो स्टेप अप बेनिफिट आणि नो क्लेम बेनिफिटच्या माध्यमातून हेल्थ कव्हर वाढवणे.
* जर एकापेक्षा जास्त सदस्य एखाद्या पॉलिसी अंतर्गत येतात तर मुळ विमित व्यक्ती अर्थात पॉलिसीधारकाचा इन्श्युर्ड वेळी दुर्दैवी मृत्यूच्या बाबतीत इतर विमित व्यक्तींसाठी प्रीमियम सूटचे धोरण
* काही प्रमुख सर्जिकल लाभांसाठी कॅटेगरी I किंवा कॅटेगरी II च्या अंतर्गत येणार्या कोणत्याही विमित सर्जरीच्या स्थितीत एक वर्षासाठी प्रीमियम सूट लाभ.
* अॅम्ब्युलन्स लाभ.
* आरोग्य तपासणीचा फायदा.
Web Title :- Arogya rakshak life insurance corporation of india lic launches lic arogya rakshak health insurance plan
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Central Universities CET | UGC ची मोठी घोषणा ! केंद्रीय विद्यापीठांमधील सीईटी परीक्षा रद्द
Aurangabad Crime | लष्करी छावणीतील झाडाला गळफास घेत जवानाची आत्महत्या; प्रचंड खळबळ
Google Chrome चा वापर करणार्यांनी व्हावे सावध, ताबडतोब करा हे काम अन्यथा होईल मोठे नुकसान