Arjun Khotkar | रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकरांमध्ये दिलजमाई ! शिवसेनेचे ‘अर्जुन’ एकनाथ शिंदे गटात ?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बंडखोरी झाल्याने महाराष्ट्रात शिवसेनेची (Maharashtra Shivsena) मोठी वाताहात झाली आहे. शिंदे गटात (Shinde Group) शिवसेनेचे आमदार गेल्यानंतर खासदारांचा (MP) एक गट शिंदे गटात सामील झाला. अशातच जालन्याचे (Jalna) शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) हे शिंदे गटात सामील झाल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी दिल्लीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांच्या भेटीला पोहोचले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) सध्या दिल्लीत दाखल झाले आहेत. मागील आठवड्यापासून ते दिल्ली मुक्कामी आहेत. या आठवड्यात त्यांनी वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. भाजपच्या नेत्यांच्याही खोतकरांनी भेटी घेतल्या आहेत.
आज दुपारी खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
या भेटीमुळे खोतकर यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्याची चर्चा रंगली आहे.
शिंदे यांची भेट घेतल्यानंतर अर्जुन खोतकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहेत.
खोतकर यांनी शिंदे गटात सामील झालेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना म्हटले, मी शिवसेना सोडली असं सोशल मीडियावर अफवा पसरवण्यात आल्या आहेत.
पण असं कुठेही काही घडलं नाही. मी आजही शिवसेनेत आहे, मी शिवसैनिक आहे, आजही आहे, उद्याही आहे आणि परवाही आहे.
मी आयुष्यभर शिवसेनेत राहणार आहे, असं अर्जुन खोतकर म्हणाले आहेत.
दरम्यान, या भेटीच्या वेळी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Union Minister Raosaheb Danve)
आणि अर्जुन खोतकर यांची दिलजमाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दिलजमाई झाली.
हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील (Hingoli MP Hemant Patil) यांच्या पुढाकाराने दानवे आणि खोतकर पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Arjun Khotkar | shiv sena leader arjun khotkar shinde met cm eknath shinde at delhi joined the cm eknath shinde group
हे देखील वाचा :
ITR Filing | जर तुमच्याकडे नसेल फॉर्म 16 तरीसुद्धा फाईल करू शकता आयटीआर, जाणून घ्या कशी आहे ही पद्धत
Comments are closed.