Arijit Singh Live Concert In Pune | अरिजित सिंगच्या गायकीची जादू अनुभवण्याची पुणेकरांना संधी, गहुंजे येथील MCA च्या स्टेडियमवर लाईव्ह कॉन्सर्ट

पुणेः Arijit Singh Live Concert In Pune | सुरांचा बादशहा असलेल्या अरिजित सिंगच्या गायकीची जादू अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. त्याचा लाईव्ह कॉन्सर्ट 16 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता गहुंजे येथील एमसीएच्या स्टेडियमवर मोठ्या दिमाखात पार पडणार आहे.
या कार्यक्रमासाठीची तिकिटे insider.in या वेबसाईटवर बुक करता येणार आहेत. अवघ्या 5999 रुपयांपासून ही तिकीटे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. यामुळे कॉन्सर्टला प्रेक्षकांची रेकॉर्डब्रेक गर्दी होण्याची शक्यता आहे. यासाठी पार्किंगची व्यवस्थाही आयोजकांकडून करण्यात आली आहे. तब्बल 50 हजारांहून अधिक संगीतप्रेमी आणि अरिजित सिंगचे चाहते एमसीएच्या स्टेडियमवर संगीताचा आस्वाद घेण्यासाठी जमा होणार आहेत.
अरिजित सिंगची जवळपास सगळीच गाणी ही अत्यंत लोकप्रिय झाली आहेत. ‘अपना बना ले’, ‘तुम क्या मिले’, ‘केसरिया’ किंवा तुमचे कोणतेही आवडते गाणे ऐकण्याची ही नामी संधी आहे. या कार्यक्रमाचे आयोजन हेरंब शेळके (Heramb Shelke) ग्रुपने केले आहे. कार्यक्रमाचे सहप्रायोजक ‘तुबोर्ग’ असणार आहेत. तर हा कार्यक्रम ‘टु बीएचके’ने श्रोत्यांसाठी आणला आहे.
Ticket link: https://insider.in/arijit-singh-live-in-pune-2025-mar16-2025/event
Comments are closed.