नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही लोकांमध्ये सेक्सबाबत कमी इच्छा चिंतेचा विषय असतो, परंतु अनेक लोक आपल्या सेक्सच्या जास्त इच्छेमुळे सुद्धा त्रस्त असतात. अशा अनेक लोकांच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की, हे सर्व नॉर्मल आहे की, हे एखाद्या मोठ्या समस्येचे संकेत आहेत. एक्सपर्ट म्हणतात की याच्या पाठीमागे अनेक कारणे असू शकतात, आवश्यक नाही की या पाठीमागे प्रत्येकवेळी वासनेचेच लक्षण असेल.
एक्सपर्टनुसार, आपल्या लैंगिक इच्छेत जीवनभर बदल होत असतात. जर तुम्हाला स्वत:मध्ये कम्फर्टेबल वाटत असेल आणि तुम्हाला असे वाटत नसेल की आपल्या सेक्शुअल बिहेवियरवरील नियंत्रण सुटत आहे तर यास नॉर्मल किंवा हेल्दी म्हटले जाऊ शकते. मग तुम्ही दिवसात दोन वेळा आणि महिन्यात एकदा सेक्स करत असाल तरी हरकत नाही.
हार्मोन- एक्सपर्ट म्हणतात जेव्हा टेस्टोस्टेरॉन लेव्हल खुप हाय होते तेव्हा लिबिडो (कामोत्तेजना) सुद्धा खुप जास्त होते. टेस्टोस्टेरॉन जेंडरच सेक्शुअल फंक्शनिंग आणि डिझायरशी संबंधीत असतात. आपल्या जीवनशैलीच्या अनेक गोष्टी आणि बॉडीच्या प्रोसेस शरीरात टेस्टोस्टेरॉन वाढल्याने होऊ शकतात. इतकेच काय एक्सरसाइज, टीनेजर अवस्थासह अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश आहे.
याशिवाय, प्रोजेस्टेरॉनमध्ये ऑएस्ट्रोजन सुद्धा कामोत्तेजनेला प्रभावित करतात. डोपामिन किंवा ऑक्सीटोसिन सारखे हार्मोनसुद्धा अनेकदा रोमान्स वाढवण्याचे काम करतात. यासाठी अनेकदा नवीन रिलेशनशिपमध्ये तुम्ही जास्त रोमँटिक होऊ शकता.
मेंस्ट्रुअल सायकल – जर तुम्हाला पीरियड्सच्या दरम्यान जास्त कामोत्तेजना जाणवली असेल तर तुम्ही जगातील एकमेव नाही. मेंस्ट्रुअल सायकलदरम्यान होणारी हार्मोनल चढ-उतार कामोत्तना कमी करू शकते आणि वाढवू सुद्धा शकते. ओव्हुलेशन दरम्यान (पीरियडपासून सुमारे 14 दिवस अगोदर) टेस्टोस्टेरॉन आणि ऑएस्ट्रोजनचा पीक असतो आणि दोन्हीही हार्मोन्सचा प्रवाह सेक्स ड्राइव्ह वाढवतो.
प्रेग्नंसी- प्रेग्नंसीदरम्यान सेक्शुअल डिझायर वाढण्याची सुद्धा अनेक कारणे असू शकतात. महिलांच्या शरीरात ऑएस्ट्रोजनची वाढल्याने सुद्धा शरीरात सेक्स ड्राइव्ह इम्प्रूव्ह होऊ शकतो. यासाठी जेनिटल्स एरियामध्ये होणार्या ब्लड फ्लोला चांगले मानले जाते जो या उत्तेजनेला वाढव÷ण्याचे काम करतो. चांगली गोष्ट ही आहे की, प्रेग्नंसीच्या दरम्यान सेक्स पूर्णत: सुरक्षित आहे.
आकर्षण- एका नात्यात सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये उत्कटता आणि उत्तेजना वाढणे खुप सामान्य आहे जी नेहमी सेक्शुअल डिझायरला सुद्धा वाढवते. एका लाँग टर्म रिलेशनशिपमध्ये कपल्स एकमेकांचा विश्वास जिंकून आणि आपल्या सेक्ससंबंधी गरजांबाबत बोलून आपल सेक्स लाईफ एन्जॉय करू शकतात.
सेक्स अॅडिक्शन म्हणजे काय – सेक्स अॅडिक्शन व्हिडिओ गेम खेळणे, स्मार्टफोन वापरणे किंवा पॉर्नचे व्यसन लागण्यासारखे आहे. मात्र, या प्रकारची वर्तणुक नशेच्या व्यसनासारखी सायकोलॉजिकल अॅडिक्शन नाही. एक्सपर्टचे यावर एकमत नाही. काही एक्सपर्टनुसार, हे एक मॅनुफॅक्चर्ड डिसॉर्डर आहे. तर काहीजण यास व्यवहारिक अॅडिक्शन समजतात, जे इंटरनेट गेमिंग डिसॉर्डर सारखे आहे.
जर कुणी व्यक्ती आपल्या हाय सेक्स ड्राईव्हबाबत चिंताग्रस्त आहे तर त्याने स्वताला प्रश्न विचारले पाहिजेत की, जसे की, काही इमोशन, रिलेशनशिपची आव्हाने किंवा वर्तणूक सेक्शुअल ड्राईव्ह वाढवते का? जर तुम्हाला वाटत असेल की, सेक्स तुमच्या सोशल लाईफवर परिणाम करत आहे आणि यामुळे तुमचे दैनंदिन जीवन प्रभावित होत आहे तर याबाबत सायकोलॉजिस्ट किंवा डॉक्टरांना भेटा आणि चर्चा करा.